पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या गाडीला अपघात, डोक्याला दुखापत

…म्हणून चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले होते.

विशेष प्रतिनिधी

Mamata Banerjee Road Accident: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जींच्या वाहनास बुधवारी अपघात झाला. त्यांचा ताफा वर्धमानहून कोलकाता येथे परतत असताना हा अपघात झाला. यावेळी दाट धुक्यामुळे त्यांच्या ताफ्यासमोर अचानक एक कार आली. यानंतर ममता यांच्या गाडीच्या चालकाला अचानक ब्रेक लावावा लागला. या अपघातात ममता बॅनर्जी यांच्या कपाळावर जखमही झाली आहे. West Bengal Chief Minister Mamata Banerjees car accident head injury

ममता बॅनर्जी यांनी बुधवारी वर्धमानमध्ये प्रशासकीय बैठकीला हजेरी लावली. त्यांना हेलिकॉप्टरने परत यायचे होते. मात्र, रिमझिम पाऊस आणि धुक्यामुळे हेलिकॉप्टर उडू शकले नाही. यानंतर त्यांना रस्ते मार्गानेच परतावे लागले. त्यांचा ताफा वर्धमानपासून काही अंतरावर आला असताना हा अपघात झाला. तृणमूल काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ममता बॅनर्जी या अपघातात जखमी झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षी जूनमध्येही ममता बॅनर्जी यांना अपघातात किरकोळ दुखापत झाली होती. निवडणूक रॅलीनंतर बागडोगरा विमानतळावर जात असताना खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. या अपघातात त्यांच्या डाव्या गुडघ्याच्या स्नायूला दुखापत झाली होती.

West Bengal Chief Minister Mamata Banerjees car accident head injury

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात