विनायक ढेरे
कोलकाता : पश्चिम बंगालच्या चॅनेली चर्चांच्या पलिकडे जाऊन विचार केला तर अनेक पैलू समोर येतात, त्यापैकी काँग्रेस – डाव्यांची अख्खी political space भाजपने खेचून घेतली. हा अत्यंत महत्त्वाचा पैलू मेन स्ट्रीम मीडियाच्या नजरेतून निसटलेला वाटतो.West bengal assembly elections2021 analysis, BJP ate whole politcal space of left parties and congress
काँग्रेस आणि डाव्यांना बंगाल विधानसभेत फक्त शून्य जागा मिळाल्यात, ही आकड्यातली वस्तुस्थिती नाही, तर या दोन्ही पक्षांचे अख्खे “राजकीय अवकाश” म्हणजे political space भाजपने व्यापून टाकली आहे. हे आजचे राजकीय वास्तव आहे.
देशाच्या निवडणूक इतिहासातील ही अभूतपूर्व घटना आहे. यात भाजपची अकारण स्तुती नाही किंवा त्यांना मेन स्ट्रीम मीडिया ज्या पध्दतीने झोडतो आहे, तसलाही प्रकार नाही.
उलट ही वस्तुस्थिती आहे, की ज्या बंगालवर एकेकाळी काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी दीर्घकाळ सत्ता गाजविली, त्या बंगालमध्ये आज दोन्ही जुन्या सत्ताधारी पक्षांचा एकही आमदार विधानसभेत बसलेला आढळणार नाही.
१९५२ ते २ मे २०२१ पर्यंत कोणीही असा विचारही करू शकत नव्हते, की एकेकाळचे हे दोन political giants आता राजकीय डायनासोर बनतील… म्हणजे डायनासोर जसे नष्ट झाले, तसे काँग्रेस आणि डावे बंगालमध्ये राजकीय दृष्ट्या नष्ट पावतील.
-मग या घटनेला कोणी काहीही लेबल लावले तरी…वस्तुस्थिती बदलत नाही. कारण महाराष्ट्रातले मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून ममतांच्या विजयाचे श्रेय त्यांच्या साहेबांना दिले आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांना आपली ताकद ममतांच्या पारड्यात टाकण्यास साहेबांनी भाग पाडल्याचे धच्चोटी ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
फारसे अस्तित्व नसलेल्या पक्षाने एकच नव्हे, तर दोन पक्षांची एकाच निवडणूकीत political space व्यापून टाकण्याचे उदाहरण हिंदुस्थानच्या निवडणूकांच्या इतिहासात दुसरे दिसत नाही.
महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाच्या बाबतीत हे घडले आहे. तो पक्ष यशवंतराव चव्हाणांनी अस्तित्वहीन करून टाकला. पण तो एका निवडणूकीत नाही. तर त्याला भरपूर वेळ लागला होता. त्यात फोडाफोडीपासून अनेक घटक जोडले गेले होते.
शिवाय शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्रात मोठा पक्ष असला तरी तो कधीही सत्ताधारी पक्ष नव्हता. या अर्थाने देखील बंगालमध्ये घडले ते हिंदुस्थानच्या निवडणूक इतिहासातील वेगळे उदाहरण ठरले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App