विशेष प्रतिनिधी
कोलकाता : स्वाभिमान आणि क्रांतीसाठीही बंगालची विशेष ओळख आहे. खुदीराम बोस ते नेताजी सुभाषचंद्र बोस यासारख्या स्वातंत्र्यवीरांची ही भूमी आहे. पश्चिम बंगालचं राजकारण सर्वात हिंस्र राजकारण म्हणून ओळखलं जातं. राडा आणि रक्तपात हे ठरलेलं आहे. बंगालला राजकीय हिंसेची परंपरा आहे. त्याची सुरुवात व्हॉईसरॉय लॉर्ड कर्जन यांच्या 1905 मधील बंगाल विभाजनाच्या निर्णयापासून सुरु आहे ती आजतागायत आहे. West Bengal Assembly Election 2021 Results Live : recent political history of West Bengal
त्यानंतर स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत हिंसक घडामोडी बंगालमध्ये घडतच आहेत. बंगालमध्ये अनेक वर्षे डाव्यांनी राज्य केलं. कम्युनिस्ट पक्षांच्या सत्ताकाळात रक्तपात व्हायचेच ते ममता बॅनर्जींच्या काळातही सुरुच असल्याचं चित्र आहे. मागील वर्षी अमित शाह हे पश्चिम बंगाल दौऱ्यावर होते त्यावेळीही त्याची प्रचिती आली होती. अमित शाहांच्या रोड शोमध्ये तुफान राडा झाला होता. रोड शोमध्ये दगडफेक करुन जाळपोळही केली होती.
पश्चिम बंगालमध्ये नक्षलवाद्यांचं मोठं जाळं आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल नेहमीच धगधगत असतं. 60च्या दशकापासून ते 80 च्या दशकापर्यंत पश्चिम बंगालचा इतिहास हा हिंसेचा इतिहास मानला जातो. 1977मध्ये काँग्रेसची सत्ता जाऊन डाव्यांची सत्ता आली. त्यानंतर 2011 पर्यंत डावे सत्तेत होते. त्यामुळे पश्चिम बंगालमधील हिंसाचार कमी झाला होता. मात्र, प्रत्येक निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये हिंसा होत असते, याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही.
ममता बॅनर्जी यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली 2011 साली प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता स्थापना झाली. डाव्यांचा गड असणाऱ्या प. बंगालमध्ये तब्बल 34 वर्षांनी झालेला हा सत्तापालट ऐतिहासिक म्हणावा असाच होता. 2016 च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या यशाची पुनरावृत्ती झाली. 2011 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर युती करून सिंगूर-नंदीग्राममधील घटनांचा परिणाम म्हणून निर्माण झालेल्या प्रस्थापित सरकारविरोधी लाटेवर स्वार होत ममता बॅनर्जींनी आपला पारंपरिक शत्रू असलेल्या डाव्या आघाडीला नामोहरम केले होते.
2016 च्या विधानसभा निवडणुकीत बॅनर्जी यांना डावी आघाडी आणि काँग्रेस यांच्या युतीशी सामना करावा लागला. दीड महिना परस्परविरोधी प्रचाराची कडवी झुंज रंगली होती. वाढता भ्रष्टाचार आणि औद्योगिकीकरणाचा अभाव हे यांत कळीचे मुद्दे होते. या निवडणुकीत भाजप जरी तिसऱ्या स्थानावर असला तरी त्यांनी केलेल्या अप्रत्यक्ष मदतीमुळे डावे आणि काँग्रेस यांच्या युतीला फायदाच झाला होता. 6, मुरलीधर सेन लेन, कोलकाता-73 या भाजपाच्या प्रदेश मुख्यालयातून नारादा न्यूज एजन्सीने केलेली स्टिंग ऑपरेशनची मालिका प्रसिद्ध करण्यात आली. या मालिकेत मुकुल रॉय, शुभेंदू अधिकारी आणि भोभन चटोपाध्याय यांच्यासारखे तृणमूलचे वरिष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री हे मॅथ्यू सॅम्युअल यांच्याकडून पैसे घेताना दिसत होते. एकूणच, औद्योगिकीकरणाचा अभाव हा मुद्दा मागे पडून भ्रष्टाचार हा ज्वलंत राजकीय मुद्दा बनला. मात्र तरीही ममता बॅनर्जी यांनी आपला प्रभाव आणि लोकप्रियता यांच्या बळावर आपल्या पक्षाला सहज बहुमत प्राप्त करून दिले.
मागील तीन वर्षांत प. बंगालमध्ये प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजपा उदयास आला आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि डाव्या पक्षांना मागे टाकत भाजपाने 42 पैकी 18 जागा जिंकल्या. विशेष म्हणजे, या निवडणुकीत नेहमी डाव्यांच्या पारड्यात पडणारी 15 टक्के मते भाजपने स्वत:कडे वळवली आणि डाव्यांना मिळणाऱ्या मतांचे प्रमाण 22.5 टक्क्यांवरून 7.5 टक्क्यांवर आले. अनेक डाव्या समर्थकांनीही भाजपच्या बाजूने मतदान केल्याचे या निवडणूक निकालांवरून स्पष्ट झाले. भाजपने प. बंगालमध्ये 2019 ची लोकसभेची निवडणूक भ्रष्टाचार आणि हिंसाचार या दोन मुद्द्यांवर लढवली. आता या विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ता काबीज करण्याचे शर्थीचे प्रयत्न करत असणाऱ्या भाजपने पश्चिम बंगालमधील 27 टक्के मुस्लीम मते आपल्या बाजूने वळवण्यासाठी आपले नेते पाठवले आहेत.
लोकसभा आणि विधानसभेतलं चित्र
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App