विशेष प्रतिनिधी
कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुकांची रणधूमाळी सुरू आहे. पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत.तिखट वार पलटवार, दावे प्रतीदावे या सर्वांमुळे पश्चिम बंगालच वातावरण काहीसं कडू झालं आहे. मात्र हे कडू वातावरण गोड केलंय ते या ‘ स्वीटमार्ट ‘ ने .
बंगालच्या हावडा येथील मिठाईच्या दुकानात विधानसभा निवडणुकीचे एक अनोखे चित्र पाहायला मिळाले. बंगालची मिठाई सर्वदूर प्रसिद्ध आहे. याच पश्चिम बंगालच्या मिठाईतही निवडणुकीचे रंग पहायला मिळत आहेत.
तीन आघाडीच्या नेत्यांचे मिठाईचे पुतळे तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह संयुक्त मोर्चाच्या तीन नेत्यांच्या समावेश आहे . हे पुतळे दिसायला इतके गोड आहेत की रस्त्यावरून येणारा जाणारा प्रत्येक व्यक्ती इथं थबकल्या शिवाय राहत नाही. हे पुतळे पाहून एक गोड स्माईलही प्रतेकाच्या चेहर्यावर उमटतेय.
मूर्तिकाराने आपली सर्व सर्जनशीलता वापरून हे पुतळे तयार केली आहेत. मोदींच्या पुतळ्यात मोदींनी वाढवलेली दाढी, मोदी जॅकेट, भाजपच्या कमळ चिन्हासह परिधान केलेला कुर्ता, बुटापासून सगळं हुबेहूब साकारलं आहे. नंदिग्राममध्ये झालेल्या दुखापतीमुळे ज्याप्रमाणे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व्हिलचेयरच्या निवडणुकीत प्रचार करत आहेत, त्याचप्रमाणे मिठाईच्या दुकानातील पुतळाही व्हिलचेअरवर उभारला गेला आहे.
पश्चिम बंगाल निवडणुकित चर्चा जरी भाजपची असली तरी मिठाई दुकानदार संयुक्त मोर्चा, डावे, कॉंग्रेस आणि इंडियन सेक्युलर फ्रंटला विसरले नाहीत. या दुकानाने त्यांचे तीन रंग असलेले पुतळे- डाव्या आघाडीचे अध्यक्ष बिमान बोस, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी आणि आयएसएफचे प्रमुख अब्बास यांच्यावर एकत्रितपणे पुतळा साकारला आहे. बरं या दुकानात केवळ पुतळे नाही तर वेगवेळ्या पक्षांची निवडणूक चिन्हं असलेली मिठाई देखील तयार करण्यात आली आहे.
West Bengal: A sweet shop in Howrah has made 'sweet' statuettes of PM Modi, CM Mamata Banerjee & leaders of Sanjukta Morcha along with sweets etched with logos of political parties "What could be better than sweets to encourage people to vote," said sweet shop owner (02.04) pic.twitter.com/UwgcZ5e9dq — ANI (@ANI) April 2, 2021
West Bengal: A sweet shop in Howrah has made 'sweet' statuettes of PM Modi, CM Mamata Banerjee & leaders of Sanjukta Morcha along with sweets etched with logos of political parties
"What could be better than sweets to encourage people to vote," said sweet shop owner (02.04) pic.twitter.com/UwgcZ5e9dq
— ANI (@ANI) April 2, 2021
खेला होबे विकास होबे’ या घोषणेवर ही निवडणूक रंगत आहे. ही घोषणा देखील मिठाईतून साकारण्यात आली आहे.
आता पश्चिम बंगालमध्ये ‘खेला’ होउद्या किंवा ‘पोरिबर्तन’ होउद्या आपण ‘ मिष्टी दिदी,रशोगूल्ला मोदी आणि संयुक्त सोंदेश’ मिठाईचा आनंद घेऊ.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App