मध्य प्रदेशात ‘ब्राह्मण कल्याण मंडळ’ स्थापन होणार; भगवान परशुराम जयंतीनिमित्त मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा!

Shivraj Singh Chouhan

ब्राह्मणांनी नेहमीच धर्म आणि संस्कृतीचे रक्षण केले आहे. असंही शिवराजिसंह चौहान यांनी म्हटलं आहे.

विशेष प्रतिनिधी

भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ब्राह्मणांसाठी मोठी घोषणा केली आहे. मध्यप्रदेश सरकारकडून ब्राह्मण कल्याण मंडळाची स्थापना केली जाणार आहे. तसेच, मंदिरांच्या जमिनींचा लिलाव जिल्हाधिकाऱ्यांकडून नाही तर पुजाऱ्यांद्वारे केला जाणार आहे. We will set up Brahmin Welfare Board Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan

भगवान परशुराम जयंतीनिमित्त मुख्यमंत्री म्हणाले की, ‘’आम्ही निर्णय घेतला आहे की, मंदिरांच्या कारभारावर सरकारचे कोणतेही नियंत्रण राहणार नाही आणि मंदिराच्या जमिनीचा लिलाव जिल्हाधिकाऱ्यांकडून नव्हे तर पुजाऱ्यांद्वारे केला जाईल. ब्राह्मणांनी नेहमीच धर्म आणि संस्कृतीचे रक्षण केले आहे, त्यामुळे त्यांच्या कल्याणासाठी आम्ही ‘ब्राह्मण कल्याण मंडळ’ स्थापन करणार आहोत.’’

भोपाळमध्ये आयोजित एका कथा कार्यक्रमात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित होते. कथा व्यास हे स्वतः बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र कृष्ण शास्त्री होते. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना संबोधित करताना मुख्यमंत्री शिवराज म्हणाले की महाराज, मी तुम्हाला आणि तुमच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला सांगू इच्छितो की आता पुजारी मंदिर आणि मंदिराच्या लगतच्या जमिनींचा लिलाव करू शकतील. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रशासन या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही. पुरोहितांना त्यांच्या गरजेनुसार जमिनीचा लिलाव करण्याचा अधिकार असेल.

राजकीय वर्तुळात मुख्यमंत्र्यांची ही घोषणा म्हणजे ब्राह्मणांना मदत करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे प्रत्येक घटकाला अनेक आघाड्यांवर मदत करण्याचा सतत प्रयत्न करत आहेत. यापूर्वी त्यांनी अनुसूचित जातींची अनेक कल्याणकारी मंडळे स्थापन करण्याची घोषणा केली होती आणि आता त्यांनी ब्राह्मण कल्याण मंडळ स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

We will set up Brahmin Welfare Board Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात