विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : General Chauhan भारताच्या सुरक्षेसमोर उभे ठाकलेले धोके दिवसेंदिवस वाढत असून ते केवळ सीमारेषेपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर आता ते बहुआयामी झाले आहेत. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी शनिवारी दिलेल्या भाषणात या धोक्यांची सविस्तर चर्चा करत सहा प्रमुख आव्हाने अधोरेखित केली. सीमारेषेवरच नव्हे तर डिजिटल व तांत्रिक रणांगणावरही ताकद दाखवावी लागणार आहे असे आवाहन त्यांनी केले.General Chauhan
भारताने पारंपरिक युद्धासाठी सज्ज राहणे गरजेचेच आहे, पण त्याचबरोबर अपारंपरिक आव्हानांनाही सामोरे जाण्याची तयारी असली पाहिजे. भविष्यातील लढाया केवळ सीमारेषांवर नाही, तर डिजिटल आणि तांत्रिक रणांगणावरही लढल्या जाणार आहेत. त्यामुळे सैन्यदलांचे आधुनिकीकरण, तंत्रज्ञानात गुंतवणूक आणि नागरी-सैन्य सहकार्य ही काळाची गरज आहे,” असे जनरल चौहान यांनी स्पष्ट केले.General Chauhan
सर्वात पहिले आणि मोठे आव्हान म्हणजे चीनसोबतचा कायमस्वरूपी सीमावाद. लडाखपासून अरुणाचलपर्यंत तणाव सुरूच आहे आणि चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) सतत आपली ताकद वाढवते आहे. दुसरे मोठे आव्हान म्हणजे पाकिस्तानकडून चालवले जाणारे ‘ब्लीडिंग इंडिया’ तंत्र. दहशतवाद, सीमापार हल्ले आणि घुसखोरीमुळे भारताला सतत अलर्ट मोडवर राहावे लागत आहे.
यानंतर त्यांनी सायबर हल्ल्यांचा धोका असल्याचे सांगितले. सायबर हॅकिंगद्वारे सरकारी यंत्रणा, बँकिंग क्षेत्र आणि संरक्षण मंत्रालयाच्या महत्त्वाच्या नेटवर्कवर आघात करण्याचे प्रयत्न वाढले आहेत. चौथा धोका म्हणजे अंतराळ क्षेत्रातील वाढती स्पर्धा. उपग्रहांचे संरक्षण, स्पेस डेब्रीस आणि शत्रूंच्या स्पेस मिलिटरी क्षमतांमुळे भारतासाठी नवे आव्हान निर्माण झाले आहे.
पाचवा धोका म्हणजे ड्रोन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखे उदयोन्मुख तंत्रज्ञान. अशा साधनांचा वापर करून लहान गटदेखील मोठे नुकसान करू शकतात. सहावा आणि शेवटचा धोका म्हणजे आतील असुरक्षा व हायब्रिड वॉरफेअर. सोशल मीडियाद्वारे अफवा, द्वेष आणि चुकीची माहिती पसरवून समाजात असंतोष निर्माण करण्याचे प्रयत्न वाढले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App