Home Minister Amit Shah : भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाषेची मदत घेणाऱ्यांना उघडे पाडू; गृहमंत्री शाह म्हणाले, दहशतवादाप्रति मोदी सरकारचे झीरो टॉलेरन्स

Home Minister Amit Shah

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : Home Minister Amit Shah केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी राज्यसभेत गृह मंत्रालयाच्या कामाकाजावरील चर्चेला उत्तर दिले. भाषेबाबत विचारलेल्या प्रश्नावर दक्षिणेतील नेत्यांवर हल्ला करत शाह म्हणाले की, हिंदी आमची माता आहे. मात्र, आम्ही मातृभाषेला आदर दिला आहे. तुमच्या धाडस असेल तर मेडिकल आणि इंजीनिअरिंगचा कोर्स तामिळमध्ये करून दाखवा. आमचे सरकार आल्यावर आम्ही हे करून दाखवू. हजारो किमी दूरवरची भाषा तुम्ही शिकू शकता, मात्र आपल्या देशातील भाषेशी अडचण आहे. शाह म्हणाले, जे भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाषेची मदत घेतात, आम्ही गावोगावी जाऊन त्यांना उघडे पाडू.Home Minister Amit Shah

शाह म्हणाले, मोदी सरकारने कलम ३७० रद्द करून घटनाकारांचे स्वप्न पूर्ण केले आहे. एक वेळ होती, जेव्हा काश्मीरमध्ये गोळीबार होत होता. कोणताही सण स्फोटकांशिवाय साजरा होत नव्हता. मात्र, कोणतेही सरकार बोलत नव्हते. बोलण्यास घाबरत होते. मात्र, आम्ही फक्त १० दिवसांत बालाकोट सर्जिकल स्ट्राइक करून सांगितले की, आम्ही सहन करणार नाहीत.शाह म्हणाले, सरकार दहशतवादाप्रति शून्य सहिष्णूता धोरण अवलंबत आहे. हुर्रियतवाले काश्मीरमध्ये गदारोळ करतात. आमच्या सरकारने हुर्रियतला जमिनीत गाडले आहे. २०१९ ते २०२४ पर्यंत हुर्रियतसारख्या १४ संघटनांवर बंदी घातली आहे.



अमेरिकेतून आतापर्यंत ३८८ भारतीय डिपोर्ट : सरकार

सरकारने शुक्रवारी संसदेत सांगितले की, जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत ३८८ भारतीय नागरिकांना अमेरिकेतून निर्वासित केले आहे. यापैकी ३३३ भारतीयांना फेब्रुवारीत ३ वेगवेगळ्या विमानांनी थेट अमेरिकेतून भारतात निर्वासित केले. विदेश राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह म्हणाले, अमेरिकेने पनामाद्वारे ५५ भारतीय नागरिकांना निर्वासित केले.

ट्रम्प टेरिफच्या मुद्द्यावर विरोधकांनी घेरले

अमेरिकी कृषी आणि डेअरी उत्पादनांच्या शुल्कमुक्त आयातीच्या वृत्तावर लोकसभेत विरोधी खासदारांनी केंद्राडे स्पष्टीकरण मागितले. काँग्रस खासदार चरणजीत सिंह चन्नी म्हणाले, अमेरिका परस्पर कर लावणार असेल तर भारतीय शेतकऱ्यांचे काय होईल. राष्ट्रवादीचे खा. अमोल कोल्हे म्हणाले, यामुळे भारतीय शेतकऱ्यांवर संकट येईल.

ड्रोनरोधक स्वदेशी तंत्रज्ञान ६ महिन्यांत तयार होईलशाह यांनी शुक्रवारी राज्यसभेत सांगितले की, भारत ड्रोनरोधक पूर्ण उपाय शोधण्याच्या जवळ आहे. आम्ही सहा प्रयोग केले. मला आशा आहे की सहा महिन्यांच्या आत आमच्याकडे ड्रोन रोशक स्वदेशी उपाय असेल. जे मेक इन इंडियाचे प्रतीक असेल. शाह म्हणाले, गेल्या पाच वर्षांत १४,००० कोटी रुपयांहून जास्त मूल्याचे २३ हजार किलो ड्रग्ज नष्ट केले आहे.

We will expose those who use language to hide corruption; Home Minister Shah said,

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात