कोरानाच्या रुग्णांची संख्या वाढल्याने पाटणा उच्च बिहार सरकारला चांगलेच फटकारले आहे. कोरोनावर उपाययोजना करणे तुम्हाला जमत नसेल तर लष्कराला बोलवा असे म्हटले आहे. We May Give Responsibility To Army: Patna High Court Slams Nitish Govt Over COVID Management
विशेष प्रतिनिधी
पाटणा : कोरानाच्या रुग्णांची संख्या वाढल्याने पाटणा उच्च बिहार सरकारला चांगलेच फटकारले आहे. कोरोनावर उपाययोजना करणे तुम्हाला जमत नसेल तर लष्कराला बोलवा असे म्हटले आहे.
कोरोनाच्या वाढत्या कहराच्या पार्श्वभूमीवर पाटणा उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी राज्या सरकारने लॉकडाऊनच्या निर्णयांची माहिती दिली. पाच मे ते १५ मे दरम्यान राज्यात लॉकडाून लावण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
मात्र, कोरोनावर उपाययोजना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरत असल्याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने वारंवार आदेश देऊनही राज्यातील स्थिती सुधारली नाही हे लाजीरवाणे आहे. राज्यातील परिस्थिी तुम्हाला सांभाळता येत नसेल तर संपूर्ण आरोग्य व्यवस्था लष्कराच्या ताब्यात देण्याची गरज आहे, अशा शब्दांत न्यायालयाने आपली नाराजी व्यक्त केली.
याबाबत बिहारचे अॅडव्होकेट जनरल ललित किशोर म्हणाले, याबाबत कोणताही लेखी आदेश नाही. मात्र, कोरोनासंदर्भात आरोग्य व्यवस्था अपयशी ठरत असेल तर कोरोना व्यवस्थापनाची जबाबदारी लष्कराकडे देण्यााची गरज आहे. न्यायालयाने सरकारकडून याबाबत सविस्तर अहवाल मागविला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more