WATCH : राहुल गांधी परदेशात कोणत्या उद्योगपतींना भेटतात? त्यांचा यामागे हेतू काय? गुलाम नबी आझादांच्या माहितीवर भाजपचा सवाल

प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी नेते आणि डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे प्रमुख गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, गांधी घराण्याचे कायमच उद्योगपतींशी संबंध राहिलेले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधींवर आरोप करताना ते म्हणाले की, ते परदेशात जाऊन नको असलेल्या उद्योगपतींना भेटतात. काँग्रेसच्या माजी नेत्याच्या या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाने (भाजप) ट्विट करून राहुल गांधींकडून स्पष्टीकरण मागितलं आहे.WATCH Which businessmen does Rahul Gandhi meet abroad Ghulam Nabi Azad



राहुल गांधी परदेशात नको असलेल्या उद्योगपतींना भेटतात – आझाद

भाजपने आझाद यांचा एक व्हिडिओ ट्विट करत म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी स्पष्ट करावे की ते कोणत्या उद्योगपतींना भेटतात आणि कोणत्या उद्देशाने भेटतात? माजी काँग्रेस नेते आझाद यांनी एका मीडिया संस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “गांधी कुटुंब नेहमीच उद्योगपतींशी जोडले गेलेले आहे आणि राहुल गांधीदेखील एक बिझनेसमन आहेत. राहुल जेव्हा परदेशात जातात तेव्हा ते तेथे नको असलेल्या व्यावसायिकांना भेटतात.”

रिमोट कंट्रोलने चालते काँग्रेस

माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी यापूर्वी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता आणि म्हटले होते की, काँग्रेस अजूनही ‘रिमोट कंट्रोल’ने चालविली जात आहे आणि आरोप केला होता की एक नवीन अननुभवी हा कारभार हाताळत आहे. ते म्हणाले होते की, मी जितका भूतकाळात जातो तितकी कटुता निर्माण होते आणि पक्षातून बाहेर पडल्यापासून मला त्यात डोकावायचे नाही.

डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे (डीपीएपी) प्रमुख आझाद म्हणाले की, एक व्यक्ती म्हणून मी राहुल गांधी वाईट व्यक्ती असल्याचे म्हणत नाही. ते व्यक्ती म्हणून चांगले माणूस आहेत. आमच्यात काही राजकीय मतभेद असतील, पण ते राजकीय मुद्दे आहेत जे मी काँग्रेसमध्ये असतानाही होते.

WATCH Which businessmen does Rahul Gandhi meet abroad Ghulam Nabi Azad

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात