वृत्तसंस्था
नवी दिल्ली : एकीकडे मैदानी भागात वाढत्या थंडीमुळे लोक घरात दडून बसले आहेत, तर दुसरीकडे उंच डोंगरावर प्रचंड बर्फवृष्टी होत असतानाही आपल्या देशाचे सैनिक अविरतपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. अनेक इंच बर्फात, पाकिस्तानच्या सीमेवर आणि जगातील सर्वोच्च युद्धभूमीवर भारतीय लष्कराचे जवान आपले कर्तव्य चोख बजावत आहेत. गेल्या दोन दिवसांत लष्कराकडून सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ ट्विट करण्यात आले आहेत, ज्यामध्ये सैनिक बर्फवृष्टीत कर्तव्य बजावताना दिसत आहेत.
#WATCH Troops of the Indian Army performed 'Khukuri Dance' in the snow-clad ranges of the Tangdhar sector in the Kupwara district of north Kashmir. Video source: Indian Army pic.twitter.com/9Rp3V1xNUB — ANI (@ANI) January 8, 2022
#WATCH Troops of the Indian Army performed 'Khukuri Dance' in the snow-clad ranges of the Tangdhar sector in the Kupwara district of north Kashmir.
Video source: Indian Army pic.twitter.com/9Rp3V1xNUB
— ANI (@ANI) January 8, 2022
त्याचवेळी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये भारतीय लष्कराचे जवान जोरदार बर्फवृष्टीमध्ये नाचत आहेत. लष्कराने हा व्हिडिओ ट्विट केला आहे. यामध्ये सैनिक हातात खुकरी घेऊन तिरंग्याभोवती नाचताना दिसत आहेत. काश्मीरमधील कुपवाडा भागातील तंगधार भागातील हा व्हिडिओ सर्वांनाच आवडला आहे.
No easy hope or liesShall bring us to our goal,But iron sacrifice Of body, will, and soul.There is but one task for allOne life for each to giveWho stands if Freedom fall? pic.twitter.com/X3p3nxjxqE — PRO LEH (@prodefleh) January 7, 2022
No easy hope or liesShall bring us to our goal,But iron sacrifice Of body, will, and soul.There is but one task for allOne life for each to giveWho stands if Freedom fall? pic.twitter.com/X3p3nxjxqE
— PRO LEH (@prodefleh) January 7, 2022
दुसर्या ट्विटमध्ये, बर्फाच्या वादळात उभे असताना लष्कराचा एक जवान ड्युटी करताना दाखवला आहे. जवानाचे पाय गुडघ्यापर्यंत बर्फात गाडले गेले आहेत, परंतु असे असूनही, त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला दिसून येत आहे. आपल्या तत्परतेमुळे देशातील नागरिक शांततेचा श्वास घेतात आणि शत्रूचे मनसुबे धुळीस मिळतात हे भारतीय लष्कराच्या जवानांना माहीत आहे. या ट्विटसोबत लष्कराने काही ओळीही लिहिल्या आहेत.
Compare this with your early morning walk in the park! #IndianArmy #BashOnRegardless VC: @Whiteknight_IA pic.twitter.com/itVLukvQT3 — PRO LEH (@prodefleh) January 7, 2022
Compare this with your early morning walk in the park! #IndianArmy #BashOnRegardless
VC: @Whiteknight_IA pic.twitter.com/itVLukvQT3
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App