वृत्तसंस्था
नवी दिल्ली : बद्रीनाथ महामार्गावरील हेलांग येथील डोंगरावरून दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला आहे. यानंतर प्रशासनाने बद्रीनाथ यात्रा थांबवली आहे. महामार्गावर पडलेल्या ढिगाऱ्याचा व्हिडिओ भयावह आहे. बद्रीनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंना पोलिसांनी खबरदारी म्हणून गौचर, कर्णप्रयाग आणि लंगासूमध्ये बॅरिअर लावून आपापल्या ठिकाणी थांबण्यास सांगितले होते. परंतु काही वेळाने प्रशासनाने रस्त्यावरील दरड हटवून अडकलेल्या हजारो प्रवाशांना दिलासा दिला.Watch: During the Badrinath Yatra, a crack fell from the mountain, the highway was closed, thousands of passengers were trapped; Watch the heart-pounding video
बद्रीनाथ महामार्गावर दरड कोसळल्याचा भीषण व्हिडिओ समोर आला आहे. डोंगराच्या दरडीमुळे महामार्ग बंद झाला होता. हजारो प्रवासी मार्गात अडकून पडले होते. यासंदर्भात प्रशासनाने माहिती दिली आहे. कर्णप्रयागचे सीओ अमित कुमार म्हणाले, “हेलांगमधील बद्रीनाथ रस्ता उघडल्यानंतर प्रवाशांना जाण्याची परवानगी दिली जाईल. वाहतूक सुरक्षेबाबत पोलिसांचा इशारा आहे, पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.”
काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ
बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरही हेलांगची छायाचित्रे समोर आली आहेत. भली मोठी दरड कोसळून महामार्गावर पडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरड कोसळतानाचा व्हिडिओ भयावह आहे. व्हिडिओमधील हे फुटेज काळजाचा ठोका चुकवणारे आहे. व्हिडिओमध्ये घटनास्थळी लोकांच्या ओरडण्याचा आवाजही ऐकू येत आहे. याशिवाय घटनास्थळी लोक इकडून तिकडे धावताना दिसत आहेत.
#WATCH | Uttarakhand: Badrinath National Highway blocked near Helang village in Chamoli district due to heavy debris coming down from a hill. pic.twitter.com/hjOuRtpIAH — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 4, 2023
#WATCH | Uttarakhand: Badrinath National Highway blocked near Helang village in Chamoli district due to heavy debris coming down from a hill. pic.twitter.com/hjOuRtpIAH
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 4, 2023
ही दरड जिथे कोसळली तिथे प्रवाशांची अनेक वाहनेही दिसत आहेत. मात्र या वाहनांचे व प्रवाशांचे कोणतेही नुकसान झाले नाही. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार मोठी दुर्घटना टळली आहे. प्रवासात अडकलेल्या भाविकांनी सांगितले की, “भगवान बद्री विशाल यांची भक्तांवर कृपा झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरड ज्या प्रकारे कोसळली त्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकली असती. शेकडो प्रवासी आजूबाजूला होते.”
#UPDATE | "The road has been opened and traffic is running smoothly," tweets Chamoli Police, Uttarakhand (Video source: Chamoli Police) pic.twitter.com/ofxG2Vd0o2 — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 5, 2023
#UPDATE | "The road has been opened and traffic is running smoothly," tweets Chamoli Police, Uttarakhand
(Video source: Chamoli Police) pic.twitter.com/ofxG2Vd0o2
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 5, 2023
यानंतर काही वेळाने चमोली पोलिसांनी ट्वीट करून माहिती दिली की, दरड कोसळल्यामुळे बंद करण्यात आलेला महामार्ग आता पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. कोसळलेली दरड रस्त्यावरून हटवण्यात आली आहे. दुसऱ्या व्हिडिओत आपण दरड हटवण्यासाठी तेथे आलेली जेसीबीही पाहू शकतो. वाहनांचे येजा पूर्ववत झाल्याने भक्तांना बद्रिनाथाचे दर्शन सुलभ झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App