49 lakh deaths due to corona in India : जून 2021 पर्यंत भारतात कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूंचा अधिकृत आकडा 4 लाखांवर पोहोचल आहे, असे असले तरी अमेरिकेतील संस्थेच्या मते हे खरे चित्र नाही. ही परिस्थिती आणखीनच वाईट असल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. अमेरिकेच्या ग्लोबल डेव्हलपमेंट ऑफ अमेरिकेने याचा अंदाज लावला आहे. या संस्थेने आपल्या अभ्यासातून कोरोनामुळे भारतात 49 लाख लोकांच्या मृत्यूचा अंदाज लावला आहे. विशेष म्हणजे वर्ल्डोमीटरनुसार अवघ्या जगात सध्या 41.9 लाख मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. पण या संस्थेने एकट्या भारतात 49 लाख मृत्यूंचा दावा केला आहे. Washington Based global development study written by Arvind Subramanyam Claims 49 lakh deaths due to corona in India
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जून 2021 पर्यंत भारतात कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूंचा अधिकृत आकडा 4 लाखांवर पोहोचल आहे, असे असले तरी अमेरिकेतील संस्थेच्या मते हे खरे चित्र नाही. ही परिस्थिती आणखीनच वाईट असल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. अमेरिकेच्या ग्लोबल डेव्हलपमेंट ऑफ अमेरिकेने याचा अंदाज लावला आहे. या संस्थेने आपल्या अभ्यासातून कोरोनामुळे भारतात 49 लाख लोकांच्या मृत्यूचा अंदाज लावला आहे. विशेष म्हणजे वर्ल्डोमीटरनुसार अवघ्या जगात सध्या 41.9 लाख मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. पण या संस्थेने एकट्या भारतात 49 लाख मृत्यूंचा दावा केला आहे.
या संस्थेने केलेल्या अभ्यासात, भारतात कोविडमुळे मृत्यूंचे जे तीन अंदाज तयार करण्यात आले आहेत, ते एक भयंकर चित्र उभे करतात. अभ्यासात असे म्हटले आहे की, भारतातील कोरोनाची दुसरी लाट ही फाळणीनंतरची सर्वात मोठी मानवी शोकांतिका आहे. हा अभ्यास सेरो सर्वेक्षण, घरगुती डेटा आणि अधिकृत डेटावर आधारित आहे. यामुळे पुन्हा एकदा भारतात कोरोना मृत्यूच्या अंडर रिपोर्टिंगकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
अभ्यासानुसार, भारतात कोरोनामुळे 34 लाख ते 49 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. असेही म्हटले आहे की, पहिली लाट अधिक प्राणघातक होती, परंतु त्यामध्ये मृत्यूचे प्रमाण कमी होते, परंतु असे असूनही त्या लाटेत 20 लाख लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. अभ्यासानुसार असे म्हटले आहे की, मृत्यूची वास्तविक संख्या हजारो नव्हे तर लाखोंमध्ये आहे, ही स्वातंत्र्यनंतरची आणि विभाजनानंतरची सर्वात मोठी मानवी शोकांतिका आहे.
पहिला अंदाज : कन्झ्युमर पिरॅमिड हाऊसिंग सर्व्हेवर आधारित या अंदाजात 49 लाखांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमईआय) दर चार महिन्यांनी हे सर्वेक्षण करवून घेते.
दुसरा अंदाज : मृत्यूच्या नोंदणीच्या आधारे 34 लाख मृत्यूंचा अंदाज आहे. तथापि, यामध्ये केवळ 7 राज्यांचा डेटा घेण्यात आला आहे.
तिसरा अंदाज : सेरो सर्वेक्षण आणि वय-विशिष्ट संसर्ग मृत्यूच्या दरावर अंदाजे 40 लाख मृत्यूंचा अंदाज आहे. पहिल्या लाटेत सुमारे 15 लाख मृत्यू ,तर दुसर्या लाटेत 24 लाख मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हा अहवाल वॉशिंग्टनमधील ग्लोबल डेव्हलपमेंट सेंटर, भारताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम, हार्वर्ड विद्यापीठाचे अभिषेक आनंद आणि ग्लोबल डेव्हलपमेंट सेंटरचे जस्टिस सेंडफोर्ड यांनी लिहिलेला आहे.
या अहवालावर प्रतिक्रिया देताना डब्ल्यूएचओच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, प्रत्येक देशाने मृत्यूंची वास्तविक आकडेवारी दाखवावी, जेणेकरून भविष्यातील मृत्यू टाळता येतील.
त्याच वेळी, ब्राउन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे डीन प्रोफेसर आशिष झा यांचे म्हणणे आहे की, कोविडची चाचणी घेण्यात आणि ओळखण्यात भारत अपयशी ठरला आहे, असा अभ्यासाचा अंदाज दर्शवितो. ते म्हणाले की, यावरून आपण या आजाराने पीडित लोकांना किती कमी लेखले हे दर्शवले आहे. दरम्यान, अद्याप यावर केंद्राची प्रतिक्रिया आलेली नाही.
Washington Based global development study written by Arvind Subramanyam Claims 49 lakh deaths due to corona in India
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App