विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Nitish Kumar बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजत आहे. सी व्होटर सर्व्हे नुसार माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि नव्याने स्थापन झालेल्या रणनितीकर प्रशांत किशोर यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे.Nitish Kumar
तेजस्वी यादव यांची लोकप्रियता 35 टक्क्यांवर पोहोचली आहे. फेब्रुवारीपासून ते सतत पहिल्या क्रमांकावर होते. मात्र जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये त्यांची रेटिंग काहीशी घसरली होती. आता पुन्हा एकदा ती वाढत आहे., प्रशांत किशोर यांनी 23 टक्के लोकप्रियता मिळविली आहे. आक्रमक प्रचार, विशेषतः भाजपाविरोधी भूमिका यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे.Nitish Kumar
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीचा सी व्होटर सर्व्हे समोर आला असून सप्टेंबर महिन्याचे आकडेवारी जाहीर केली आहे. एकीकडे एनडीएच्या माध्यमातून भाजप आणि नितीश कुमार यांनी पुन्हा सत्ता आणण्यासाठी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे त्यांच्यासमोर तेजस्वी यादव आणि जन सुराज अभियानचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी मोठं आव्हान उभं केलं आहे.Nitish Kumar
सी वोटर सर्व्हेनुसार मुख्यमंत्री नीतीश कुमार (Nitis यांची रेटिंग 16 टक्क्यांवर नोंदली गेली आहे. एनडीएचे सम्राट चौधरी यांची लोकप्रियता घसरून 6.5 टक्क्यांवर आली आहे. प्रशांत किशोर यांचा प्रचार एनडीएच्या मतदारांवर परिणाम करत असून त्याचा थेट फायदा तेजस्वी यादव यांना होत असल्याचं मत या सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आलं आहे.
तेजस्वी यादव आणि प्रशांत किशोर यांना जनाधार मिळत आहे. याचे प्रत्यक्ष मतांमध्ये रुपांतरित झाली, तर या दोघांना मोठा फायदा मिळू शकतो. प्रशांत किशोर यांना सध्या अंदाजे 8 ते 10 टक्के मत शेअर मिळेल असे गृहित आहे, पण त्यांना किंगमेकर बनण्यासाठी किमान 25 टक्के मतशेअर आवश्यक आहे.
सी व्होटर सर्व्हेचे प्रमुख यशवंत देशमुख यांच्या मते, नीतीश कुमार यांच्या महिला केंद्रित योजनांचा प्रभाव आजही कायम आहे. सायकल योजना आणि महिला रोजगार योजना यामुळे महिलांमध्ये त्यांच्यावरील विश्वास टिकून आहे, ज्यामुळे त्यांच्या मतदार आधाराला मजबुती मिळू शकते.
सी वोटर ट्रॅकरनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता 57 टक्क्यांवरून घसरून 51 टक्क्यांवर आली आहे. दुसरीकडे, राहुल गांधी यांची रेटिंग 35 टक्क्यांवरून 41 टक्क्यांवर गेली आहे. यामुळे दोघांमधील अंतर केवळ 10 टक्के इतके राहिले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App