वृत्तसंस्था
लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला शून्य जागा मिळतील, असे भाकीत समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले होते. त्यावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी त्यांना टोला लगावला आहे. अखिलेश यादव हे तर फार मोठे ज्योतिषी आहेत. त्यामुळेच त्यांनी काँग्रेसला शून्य जागा मिळण्याचे भाकीत केले आहे. पाहु या राज्यातली जनता कुणाला कौल देते ते!!, अशा शब्दात प्रियंका गांधी यांनी टोला हाणला आहे.War of words between akhilesh yadav and priyanka gandhi
उत्तर प्रदेशात काँग्रेसने आधीच ४०% महिलांना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे.. त्याची अंमलबजावणी केली जाईल. महिलांसाठी काँग्रेसचा स्वतंत्र जाहीरनामाही प्रसिद्ध करण्यात येईल, असे प्रियंका गांधी यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात सत्तेवर आल्यास महाविद्यालयीन युवतींना स्कुटी देण्याची घोषणा देखील प्रियंका गांधी यांनी केली आहे. त्यांनी लखीमपुर हिंसाचाराचा मुद्दा अचूक टाइमिंगने लावून धरला होता. त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपुर या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांना ललकारण्याची हिंमत अखिलेश यादव यांच्या आधी दाखवली होती. या राजकीय पार्श्वभूमीवर अखिलेश यादव आणि प्रियांका गांधी यांच्या असले शब्द युद्ध पाहायला मिळत आहे.
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी झंजावती प्रचार करून भाजपला पराभूत केले. पण राज्यात एकेकाळी पूर्ण बहुमत आणि सत्तेवर असणाऱ्या काँग्रेसला 292 विधानसभा मतदारसंघात फक्त शून्य जागा मिळाल्या. त्यावरूनच अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात देखील काँग्रेसला शून्य जागा मिळतील, असे भाकीत केले आहे त्यावरून प्रियंका गांधी यांनी अखिलेश यादव फार मोठे ज्योतिषी आहेत, असा टोला लगावला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App