Waqf jpc च्या बैठकांमध्ये गदारोळ करून सगळ्या विरोधकांमध्ये मुस्लिमांचे मोठे मसीहा दाखवण्याची स्पर्धा!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Waqf सुधारणा कायद्याचा अंतिम मसुदा तयार करून तो संसदेला सादर करायची वेळ आली असताना Waqfjpc मधल्या विरोधी सदस्यांनी बैठकांमध्ये गदारोळ करून समितीचे कामकाज लांबवायचा प्रयत्न चालवला. या पार्श्वभूमीवर Waqf jpc मध्ये नेमके चालले काय, याचा खुलासा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला.

Waqf jpc च्या बैठकांमध्ये विरोधी खासदारांचे वर्तन नेहमीच गदारोळ करायचे राहिले. Waqf सुधारणा विधेयकातील कायदेशीर तरतुदींच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यापेक्षा आपण विरोध कसा करू शकतो, समितीचे कामकाज कसे लांबवू शकतो यावर त्यांनी भर दिला. मुसलमानांसाठी आम्ही कसा संघर्ष केला, Waqf jpc च्या बैठकांमध्ये संबंधित सुधारणा विधेयकाला किती विरोध केला हे दाखविण्याची विरोधकांमध्ये स्पर्धा लागली आहे. आम्हीच मुसलमानांचे मसीहा आहोत हे दाखवायचा विरोधकांचा प्रयत्न आहे. म्हणूनच ते प्रत्येक बैठकीमध्ये गदारोळ करून चर्चेत अडथळा आणायचा प्रयत्न करतात असा आरोप नरेश म्हस्के यांनी केला.

Waqf jpc च्या मागच्या बैठकीत खासदार असदुद्दीन ओवैसी, खासदार अरविंद सावंत खासदार कल्याण बॅनर्जी अशा 10 खासदारांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर विरोध करून गदारोळ केला होता. त्यामुळे समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांना संबंधित 10 सदस्यांना निलंबित करावे लागले होते. त्यानंतर आज या समितीचे पुन्हा बैठक होत आहे.

Ahead of Waqf JPC meeting today, Shiv Sena MP Naresh Mhaske says

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात