“आपल्या संसदेकडे चर्चेसाठी अधिक शिस्तबद्ध आणि मजबूत व्यासपीठ म्हणून जगाने पाहिले पाहिजे.” असंही उपराष्ट्रपती म्हणाले.
प्रतिनिधी
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, ”भारताकडे G 20 चं अध्यक्षपद आहे. भारतासाठी हा गौरवशाली क्षण आहे अशावेळी भारतातला एक खासदार विदेशात जाऊन भारतावर टीका करत असेल, देशाचा अपमान करत असेल तर ते कदापि सहन केलं जाणार नाही.”VP Dhankhar takes a veiled attack at Rahul Gandhi’s speech made in UK
परदेशात जाऊन आपल्या देशावर टीका करणं हे साफ चुकीचं आहे. तसंच भारताच्या संसदेत माईक बंद केला जातो हे म्हणणं खोटं आहे. अशा शक्तींचा पर्दाफाश करून त्यांना अयशस्वी करण्याचे आवाहन धनखड यांनी जनतेला केले. यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या नावाचा उल्लेख मात्र केल नाही.
शी जिनपिंग तिसऱ्यांदा बनले चीनचे राष्ट्राध्यक्ष
वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कर्ण सिंह मुंडक यांच्या उपनिषदावर आधारीत पुस्तकाचं प्रकाशन जगदीप धनखड यांनी केलं. यावेळी त्यांनी राहुल गांधींचं नाव न घेता टीका केली आहे. भारताच्या संसदेत माईक बंद केला जातो हे इथल्या खासदारने परदेशात जाऊन म्हणणं हा देशाचा अपमान आहे. असं उपराष्ट्रपती म्हणाले.
#WATCH | VP Dhankhar takes a veiled attack at Rahul Gandhi's speech made in UK "If I observe silence on this orchestration by an MP outside the country,which is motivated,I'll be on wrong side of Constitution. How can I sanctify statement that mics in Indian parliament put off?" pic.twitter.com/zSmllfosXI — ANI (@ANI) March 10, 2023
#WATCH | VP Dhankhar takes a veiled attack at Rahul Gandhi's speech made in UK
"If I observe silence on this orchestration by an MP outside the country,which is motivated,I'll be on wrong side of Constitution. How can I sanctify statement that mics in Indian parliament put off?" pic.twitter.com/zSmllfosXI
— ANI (@ANI) March 10, 2023
राहुल गांधींनी केंब्रिजच्या लेक्चर मध्ये आणि त्यानंतर ब्रिटिश पार्लमेंटच्या कमिटी हॉलमध्ये दिलेल्या लेक्चर मध्ये भारतीय संसदेत विरोधकांचा माईक बंद केला जातो. त्यांचा आवाज दाबला जातो, असा दावा केला आहे. त्यानंतर भाजपाने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. तरीही राहुल गांधी यांची विधानं थांबवली नाहीत. या वक्तव्याच्या दुसऱ्या दिवशीही राहुल गांधी यांनी देशाविषयी वक्तव्य केलं होतं.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App