प्रतिनिधी
मुंबई : निवडणूक आयोगाने १ नोव्हेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीमध्ये मतदार यादी संक्षिप्त पुन:परीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकाला आपल्या संबंधीत विधानसभा मतदार यादीमध्ये नाव नोंदविता येईल. मतदार यादीशी संबंधित दुरुस्त्या, दावे , आक्षेप निकाली काढणे इत्यादी सर्व कार्यवाही पूर्ण करुन ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. हीच यादी मुंबईसह सर्व महापालिकेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ग्राह्य राहणार आहे.voter registration from 1 to 30 November; Almost all municipal elections including Mumbai have started
ही बाब लक्षात घेता, पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार म्हणून नोंदवावे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदान करुन संविधानिक कर्तव्य बजावून मतदानाची सरासरी टक्केवारी वाढण्यासाठी मदत करावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी बृहन्मुंबई केले आहे.
निवडणूक आयोगातर्फे १ नोव्हेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत मतदार यादी संक्षिप्त पुन:परीक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे. यामध्ये, १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणा-या नागरिकाला, त्याच्या संबंधीत विधानसभा मतदार यादीत आपले नाव नोंदविता येणार आहे. तसेच नाव आणि पत्त्यातील दुरुस्त्याही करणे, नावातील दुबार, समान नोंदी मतदार यादीमधून वगळणे, मृत आणि स्थलांतरित व्यक्तींची नावे वगळणे तसेच याबाबत आक्षेप दावेही दाखल करणे, ही सर्व कार्यवाही करता येणार आहे.
सर्व दावे – आक्षेप २० डिसेंबर २०२१ पर्यंत निकाली काढण्यात येऊन १ जानेवारी २०२२ रोजी या अर्हता दिनांकावर आधारित अंतिम मतदार यादी ही ५ जानेवारी, २०२२ रोजी प्रसिद्ध होणार आहे. हीच प्रसिद्ध अंतिम मतदार यादी महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मुंबईतील सर्व नागरिकांना या मतदार यादी संक्षिप्त पुन:परीक्षण कार्यक्रमाची माहिती व्हावी तसेच अधिकाधिक प्रमाणात मतदार नोंदणी, नावातील दुरुस्त्या व्हाव्यात याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाच्या माध्यमातून विविध माध्यमांचा उपयोग करुन मतदार नोंदणी जनजागृती करण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांमार्फत मुंबईतील प्रमुख ठिकाणी, तसेच प्रमुख रेल्वे स्थानके, दवाखाने, उद्याने, विमानतळ इत्यादी वर्दळीच्या ठिकाणी मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचे पोस्टर्स, बॅनर्स, स्टिकर्स लावण्यात येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App