विशेष प्रतिनिधी
मुंबई : Kirit Somaiya मालेगावमध्ये 1500 बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जन्मदाखला देण्यात आला असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. मालेगाव हे रोहिंग्यांचे आश्रयस्थान झाले आहे. आपल्याकडे यासंदर्भात मोठ्या प्रमाणात पुरावे आले आहेत. मालेगावातून व्होट जिहाद सुरु आहे, असा दावाही किरीट सोमय्या यांनी केला आहे.Kirit Somaiya
पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या म्हणाले, मालेगावात 1500 बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जन्मदाखला देण्यात आला आहे. ही खूप गंभीर बाब आहे. या प्रकरणात मी स्वतः लक्ष देत आहे. या प्रकरणात दोन प्रकारचे गोंधळ दिसत आहे. एकात सर्व सामान्य माणूस फसत आहे. दुसऱ्या बाजूला राजकारणी, माफिया, गुंड, भ्रष्टाचारी, ड्रग माफिया ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी मनी लॉंड्रींग करत आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
किरीट सोमय्या म्हणाले, मालेगावात जे भारतीय नाहीत त्या 1500 जणांना जन्माचा दाखला दिला गेला आहे. मालेगाव मनपामधून हे जन्मप्रमाणपत्र दिले गेले आहेत. या सर्व लोकांनी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्यांच्याकडून आधारकार्ड झाले असल्याची शक्यता आहे. या सर्व लोकांची चौकशी करावी, तसेच त्यांचे जन्मप्रमाणपत्र रद्द करावे, अशी मागणी आपण सरकारकडे करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे. तसेच या प्रकरणातील अधिकाऱ्यांचे निलंबन करावे, अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.
पुढे बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयातून आणि आयुक्त कार्यालयातून हे दाखले देऊन टाकले आहेत. त्यावर एकच पत्ता आहे. बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय बनवण्यासाठी जन्म दाखला देण्याचा हा प्रकार आहे. मालेगाव तहसीलदार, महानगरपालिका आयुक्त यांनी आपली चूक मान्य केली आहे. अनवधानाने हे जन्मप्रमाणपत्र देण्यात आल्याचे त्यांनी म्हंटले आहेत. ज्यांना प्रमाणपत्र दिले आहे त्यांची परत चौकशी केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App