Operation Sindoor मध्ये 100 + दहशतवाद्यांचा खात्मा; फेक न्यूजच्या गदारोळात भारत सरकारकडून अधिकृत आकडा जाहीर!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तान मधल्या दहशतवादी केंद्रांवर केलेल्या “ऑपरेशन सिंदूर’ मधल्या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मारले गेले, याचे वेगवेगळे आकडे सोशल मीडियातून समोर आले. पाकिस्तानी सरकारने भारताच्या हल्ल्यात 31 पाकिस्तानी नागरिक मारले गेले, तर 57 जखमी झाले, असा दावा केला. परंतु भारत सरकारने आज अधिकृतरित्या दहशतवाद्यांच्या खात्म्याचा आकडा जाहीर केला. ऑपरेशन सिंदूर मध्ये शंभर पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. हा आकडा वाढू शकतो. कारण पुढील आकडेवारी मोजणे सुरू आहे, असे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले. ani या वृत्त संस्थेने त्या संदर्भातले ट्विट केले.

“ऑपरेशन सिंदूर” संदर्भात कालच्या सरकारी ब्रीफिंग मध्ये दहशतवादी मारले गेल्याचा कुठलाही आकडा जाहीर करण्यात आला नव्हता. पण आज मात्र सरकारने अधिकृत आकडा जाहीर केल्याने त्याला विशेष महत्त्व आहे.

“ऑपरेशन सिंदूर” संदर्भात सोशल मीडियातून वेगवेगळ्या फेक न्युज पसरवल्या जात आहेत. लोक वाटेल तसे आकडे फेकत आहेत. त्यातून भारताची बदनामी करण्याचा अनेकांचा डाव दिसतोय. त्यामुळे फेक न्युजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केंद्रीय कायदेमंत्री किरण रिजिजू यांनी केले.

त्याचवेळी सरकारी सूत्रांनी ऑपरेशन सिंदूर मधला आकडा जाहीर केला. ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानातल्या नऊ शहरांमध्ये 21 ठिकाणांवरच्या हल्ल्यात शंभर पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. मात्र हा आकडा वाढू शकतो कारण पुढची आकडेवारी मोजणे अजून सुरू आहे, असेही सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले.

Visuals from the Pakistani city of Bahawalpur in Punjab province show

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात