वृत्तसंस्था
नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृतकालात भारत प्रगत आणि प्रगतिशील देशांचा समूह जी 20 च्या अध्यक्षस्थानी विराजमान होणार आहे. या जी 20 देशांचे शिखर संमेलन भारत हात होणार आहे. या पार्श्वभूमीवर जी 20 देशांच्या भारतातल्या संमेलनाच्या लोगोचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आले. कमल पुष्पावर अंकित विश्व असे या लोगोचे स्वरूप आहे. Vishwa inscribed on the lotus flower; Indian Concept G20 Logo Released
या विषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना लोगोच्या प्रकाशन समारंभात व्यक्त केल्या. जी 20 आयोजनात सहभाग असलेला प्रत्येक घटक या लोगो प्रकाशन समारंभात ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी जी 20 वेबसाईटचे देखील अनावरण करण्यात आले. जी 20 देशातील भारतीय दूतावासातील अधिकारी आणि कर्मचारी ऑनलाईन उपस्थित होते.
दिल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से भारत के G20 प्रेसीडेंसी के लोगो, थीम और वेबसाइट का अनावरण किया। pic.twitter.com/jMg2uTrWI7 — ANI_HindiNews (@AHindinews) November 8, 2022
दिल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से भारत के G20 प्रेसीडेंसी के लोगो, थीम और वेबसाइट का अनावरण किया। pic.twitter.com/jMg2uTrWI7
— ANI_HindiNews (@AHindinews) November 8, 2022
कमल पुष्पावर अंकित विश्व ही केवळ भारतीयांसाठी प्रतीकात्मकता नाही, तर भारतीयांच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असलेली समृद्धीची देवता अर्थात लक्ष्मी आणि ज्ञानाची देवता अर्थात सरस्वती या कमलपुष्पांवरच विराजमान असते, याची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दिली आहे. त्याचवेळी भारताच्या जय जगत या घोषणेचा पुनरुच्चार देखील त्यांनी केला. या जय जगत घोषणेच्या प्रेरणेतूनच ग्लोबल वॉर्मिंग विरोधात संपूर्ण जगाने छेडलेल्या युद्धात भारताने वन सन – वन वर्ल्ड – वन ग्रिड ही संकल्पना जगाला दिल्याचे सांगितले.
भारताच्या जीवनाकडे पाहण्याच्या एकात्म दृष्टीने दृष्टीकडे संपूर्ण जग आज कुतूहलाने बघत आहे, इतकेच नाही तर जागतिक पातळीवरच्या अवघड समस्या या एकात्मिक जीवन दृष्टिकोनातून कशा सोडवता येतील यासाठी भारताकडे आशेने पाहत आहे, असा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App