युवक कॉँग्रेसच्या नेत्यांची बलात्काऱ्यांची टोळी मुलींना एका मारुती व्हॅनमध्ये फार्म हाऊस किंवा एखाद्या बंगल्यात घेऊन जात असे. तेथे त्यांच्यावर बलात्कार केला जाई. त्यावेळी फोटोही काढले जात. त्यांचे नग्न आणि बलात्कार होतानाचे फोटो लॅबमध्ये दिले जात. याच लॅबमधून काही आंबटशौकिन कर्मचाºयांनी हे फोटो अनेकांना दाखवायला सुरूवात केली. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना हे समजल्यावर त्यांनी चौकशी केली आणि बलात्काराचे प्रकरण उघडकीस आले.Vishwa Hindu Parishad activists had exposed the Ajmer gang rape case
विशेष प्रतिनिधी
अजमेर : युवक कॉँग्रेसच्या नेत्यांची बलात्काऱ्यांची टोळी मुलींना एका मारुती व्हॅनमध्ये फार्म हाऊस किंवा एखाद्या बंगल्यात घेऊन जात असे. तेथे त्यांच्यावर बलात्कार केला जाई. त्यावेळी फोटोही काढले जात. त्यांचे नग्न आणि बलात्कार होतानाचे फोटो लॅबमध्ये दिले जात. याच लॅबमधून काही आंबटशौकिन कर्मचाऱ्यांनी हे फोटो अनेकांना दाखवायला सुरूवात केली. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना हे समजल्यावर त्यांनी चौकशी केली आणि बलात्काराचे प्रकरण उघडकीस आले.
याबाबतची कहाणी अशी आहे की पुरुषोत्तम नावाचा एक रील डेव्हलपर होता. त्याचा एक मित्र देवेंद्र जैन हा अश्लिल मासिक पाहत होता. त्यावेळी पुरुषोत्तम फुशारकी मारत म्हणाला हे तर काहीच नाही मी तुला खरे फोटो दाखवतो. त्याने देवेंद्रला हे फोटो दिले. त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांपर्यंत हे फोटो पाठविले. दैनिक नवज्योती या वृत्तपत्रात संतोष गुप्ता यांनी लैंगिक शोषणाच्या प्रकाराची पहिली बातमी दिली. त्यामुळे खळबळ उडाली. या प्रकरणावर जनक्षोभामुळे अजमेर बंद करण्यात आले.
एकूण अठरा जणांची आरोपी म्हणून नावे होती. त्यापैकी पुरुषोत्तम याने 1994 मध्ये आत्महत्या केली. जिल्हा सत्र न्यायालयाने 1998 मध्ये आठ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, परंतु राजस्थान उच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. 2001 मध्ये चार आणि सुप्रीम कोटार्ने 2003 मध्ये उरलेल्यांची शिक्षा दहा वर्षांपर्यंत कमी केली.
नफीस चिश्ती हा ड्रगच्य व्यवहारातही अडकला होता. 2003 पर्यंत फरार होता. दिल्ली पोलिसांनी त्याला शोधून काढले. इक्बाल भट याला 2005 पर्यंत पोलीसांना गुंगारा देत होता. सुहेल गनी चिश्तीने 2018 मध्ये आत्मसमर्पण केले. सध्या सहा आरोपी नफीस चिश्ती, इक्बाल भट, सलीम चिश्ती, सय्यद जमीर हुसैन, नसीम उर्फ टारझन आणि सुहेल गनी यांच्यावर न्यायालयात खटला चालू आहे, परंतु ते सर्व जामिनावर बाहेर आहेत. अल्मास महाराज या आणखी एका संशयिताला कधीही पकडले गेले नाही आणि तो अमेरिकेत राहत असल्याचे समजते. त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट आणि रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App