T20 World Cup : विराट कोहलीचा टी-२० विश्वचषक स्पर्धेत नवा विश्वविक्रम; भारताच्या 168 धावा

वृत्तसंस्था

एडलेड : भारत विरुद्ध इंग्लंड हा सेमीफायनल सामना सुरू असतानाच विराट कोहलीने मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. आतापर्यंत कोणत्याच खेळाडूला टी-२० विश्वचषकात एवढी मोठी कामगिरी करता आलेली नाही. भारताने 20 षटकात 6 विकेट गमावून 168 धावा केल्या आहेत. Virat Kohli’s new world record in T20 World Cup; India’s 168 runs

कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावा  

विराटने पाकिस्तानविरूद्ध नाबाद ८२ धावा, नेदरलॅंड्सविरुद्ध ६२, बांगलादेशविरुद्ध ६४ तर झिम्बाब्वेविरुद्ध २६ धावा केल्या. या ५ पैकी ३ डावांमध्ये विराट नाबाद राहिला आहे. टी-२० वर्ल्डकपमध्येही विराट कोहलीने सर्वाधिक २४६ धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही विराट दमदार फलंदाजी करत आहे. भारताचा डाव सावरत विराटने विश्वविक्रम रचला आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. विराटने १३८.१५ च्या स्ट्राईक रेटने ४००० धावा केल्या आहेत.

अ‍ॅडलेड हे नेहमीच कोहलीचे आवडते मैदान राहिले आहे. त्याने येथे सर्व फॉरमॅटमध्ये ७५.५८ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. या मैदानावर त्याने कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक झळकावले होते. या मैदानावर आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये कोहली एकदाही बाद झालेला नाही. यापूर्वी त्याने २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद ९० आणि या विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध ६४ धावांची खेळी केली आहे.

Virat Kohli’s new world record in T20 World Cup; India’s 168 runs

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात