जाणून घ्या, आतापर्यंत ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले टॉप 10 खेळाडू कोण आहेत?
विशेष प्रतिनिधी
त्रिनिदाद : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाच रन मशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीने आपल्या नावावर नवा विक्रम नोंदवला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज संघात त्रिनिदाद येथे दुसरा कसोटी सामना सुरू असून, हा दोन्ही संघातील १००वा कसोटी सामना आहे. तर, विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीयकारकीर्दीतील हा ५०० वा सामना ठरला आहे. Virat Kohli in the list of legendary players who played 500 international matches
यामुळे विराट कोहली आता ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत पोहचला आहे. या निमित्त जाणून घेऊयात आतापर्यंत असा विक्रम कोणत्या खेळाडूंच्या नावावर आहे आणि यादीत अव्वलस्थानी कोण आहे.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा दहावा क्रिकेटपटू ठरला आहे. तर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने (६६४) खेळण्याचा विक्रम मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.
यानंतर श्रीलंकेचे महेला जयवर्धने (६५२), कुमार संगकारा (५९४), सनथ जयसूर्या (५८६), ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग (५६०), भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (५३८), पाकिस्तानचा अष्टपैलु खेळाडू शाहिद आफ्रिदी (५२४), दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलु खेळाडू जॅक कॅलिस (५१९) आणि भारताचा माजी खेळाडू राहुल द्रविड (५०९) यांचे यादीत अनुक्रमे नाव येते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App