Virat Kohli : क्रिकेटच्या देवाचे रेकॉर्ड तोडून विराटने त्याला केले अभिवादन!!

virat kohli century in semifinal india vs newzealand

विशेष प्रतिनिधी

मुंबई : क्रिकेटच्या देवाचे रेकॉर्ड तोडून विराटने (virat kohli) त्याला केले अभिवादन!! हा अपूर्व क्षण समस्त भारतीयांनी आज अनुभवला!! एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहून ठेवावा असा अचाट पराक्रम विराट कोहलीने केला. न भूतो न भविष्य अशी कामगिरी विराट कोहली याने केली. virat kohli century in semifinal india vs newzealand

वर्ल्ड कप 2023 चा पहिला सेमीफायनल सामना मुंबईच्या वानखे़डे मैदानात खेळवला गेला. न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात विराट कोहलीने वनडे क्रिकेटमधील 50 वे शतक ठोकले. विराटचा हा पराक्रम पाहिला क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर स्वतः वानखेडे स्टेडियम वर उपस्थित होता. विराटने शतक पूर्ण करतात बॅट मैदानावर ठेवून हेल्मेट काढून सचिनच्या दिशेने हात उंचावून वंदन केले.

विराटच्या या अफाट कामगिरीमुळे आता विराट खऱ्या अर्थाने वनडे क्रिकेटचा बादशाह झाला आहे. विराट कोहली याने क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकरचा 49 शतकांचा रेकॉर्ड मोडला आहे.

विराट कोहलीने साऊथ अफ्रिकाविरुद्घच्या सामन्यात वनडे क्रिकेटमधील 49 वं शतक पूर्ण केलं होतं. कोहलीने हे शतक करताना सचिन तेंडुलकरच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली होती. वाढदिवसादिवशी विराटने ही कामगिरी केली होती. त्यामुळे आता विराट यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये 50 वे शतक ठोकणार का??, असा सवाल विचारला जात होता. अशातच विराट कोहलीने 291 व्या सामन्यात 106 बॉलमध्ये विराटने 50 वे शतक पूर्ण केले.

सचिन तेंडूलकरचा विक्रम

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला. सचिन तेंडुलकरने 452 वनडे डावात 44.8 च्या सरासरीने तब्बल 18 हजार 426 धावांचा पाऊस पाडला आहे. यादरम्यान त्याने 49 शतकं ठोकली आहेत. त्याशिवाय 96 अर्धशतकंही लगावली आहेत. सचिन तेंडूलकरने वनडे क्रिकेटमध्ये एक वेळा 200 चा आकडा देखील पार केलाय.

virat kohli century in semifinal india vs newzealand

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात