वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर विराट कोहली टी-२० चे नेतृत्वपद सोडणार आहे. अशी घोषणा त्याने ट्विटरवरून केली आहे. मात्र कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपण नेतृत्व करत रहाणार असल्याचे त्याने सांगितले आहे. त्यामुळे आता नवा कर्णधार कोण होणार याकडे साऱ्यांच्या नजरा राहणार आहेत. Virat Kohali will skip T 20 captionship
विराट म्हणतो, हा निर्णय घेताना मी बराच विचार केला. माझ्या अतिशय जवळच्या व्यक्तींसह रवी शास्त्री आणि रोहित शर्मा यांच्याशीही चर्चा केली आणि त्यानंतर माझा विचार निश्चित केला. माझा निर्णय मी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा तसेच निवड समिती यांना कळवला आहे.
वर्कलोड हा सध्याचा सर्वात महत्वाचा घटक ठरत आहे. गेली ८-९ वर्षे मी तिन्ही प्रकारात खेळत आहे आणि ५-६ वर्षे या सर्व प्रकारात नेतृत्वही करत आहे. आता कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी पूर्ण झोकून देण्यासाठी मला स्वतःला आता वेळ देण्याची गरज आहे. ट्वेन्टी-२० चे कर्णधारपद सांभाळताना मी सर्वस्व दिलेले आहे, आता या प्रकारात मी केवळ खेळाडू म्हणून खेळणार आहे, असे विराटने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App