प्रतिनिधी
नवी दिल्ली : मुस्लिमांसाठी पवित्र मानल्या गेलेल्या हज यात्रेतला व्हीआयपी कोटा संपुष्टात आणण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. त्यामुळे हाज यात्रेला जाणाऱ्या सर्व भाविकांना सर्वसामान्य यात्रेची मूभा कायम राहणार आहे. सौदी अरेबिया आणि भारत या दोन देशांमध्ये झालेल्या करारानुसार 1.75 लाख भारतीय हज यात्रा करू शकतील. VIP Quota on Hajj Pilgrimage ends; General pilgrimage to all devotees; Modi government’s decision
आत्तापर्यंत हज यात्रेसाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री, हज कमिटी ऑफ इंडिया या सर्वांना विशिष्ट कोटा केंद्र सरकारने ठरवून दिला होता. राष्ट्रपती 100, उपराष्ट्रपती 75, पंतप्रधान 75, अल्पसंख्यांक मंत्री 50 आणि हज कमिटी ऑफ इंडिया 200 अशा लोकांची शिफारस करून त्यांना व्हीआयपी कोट्यातून हज यात्रेला पाठवू शकत होते.
परंतु आता सर्वांचाच कोटा संपुष्टात आणण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतल्याने आता कोणत्याही इच्छुक भाविकाला सर्वसामान्यांप्रमाणेच हज यात्रा करावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App