विशेष प्रतिनिधी
लडाख : Sonam Wangchuk लडाख या केंद्रशासित प्रदेशाला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी बुधवारी लेहमध्ये हिंसक निदर्शने झाली. विद्यार्थ्यांची पोलिस आणि सुरक्षा दलांशी चकमक झाली, यात चार जणांचा मृत्यू झाला आणि ७० हून अधिक जण जखमी झाले. तरुणान मूर्खपणा थांबवण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुकयांनी केले आहे.Sonam Wangchuk
निदर्शनां दरम्यान विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली, भाजप कार्यालय आणि सीआरपीएफच्या वाहनाला आग लावली. दरम्यान, प्रशासनाने लेहमध्ये परवानगीशिवाय रॅली आणि निदर्शने करण्यास बंदी घातली आहे. गेल्या १५ दिवसांपासून उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ हे विद्यार्थी निदर्शने करत होते. त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ निदर्शकांनी आज बंदची हाक दिली होती, ज्यामुळे हिंसाचार झाला.Sonam Wangchuk
हिंसाचारानंतर वांगचुक म्हणाले,हा लडाखसाठी दुःखद दिवस आहे. आम्ही पाच वर्षांपासून शांततेच्या मार्गावर चालत आहोत. आम्ही उपोषण केले, लेहपासून दिल्लीपर्यंत पायी चाललो. आज, आम्ही शांतीचा संदेश अपयशी होताना पाहत आहोत. हिंसाचार, गोळीबार आणि जाळपोळ सुरू आहे. मी लडाखच्या तरुण पिढीला हा मूर्खपणा थांबवण्याचे आवाहन करतो. आम्ही आमचे उपोषण सोडत आहोत आणि निदर्शने थांबवत आहोत.
मागण्यांबाबत पुढील बैठक ६ ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणार आहे. २०१९ मध्ये कलम ३७० आणि ३५अ रद्द करण्यात आले तेव्हा जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश म्हणून निर्माण करण्यात आले. राज्यातील परिस्थिती सामान्य झाल्यानंतर पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App