बिहार : सासारामनंतर नालंदामध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत हिंसाचार; गोळीबारात तीन जण जखमी

Nalanda riots

परिस्थितीचे गांभीर्य पाहता नालंदामध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

विशेष प्रतिनिधी

बिहारच्या सासाराममध्ये रामनवमीच्या मिरवणुकीवरून झालेल्या गदारोळानंतर नालंदामध्येही प्रचंड हिंसाचार झाला होता. मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ झाली. जमावाने अनेक दुचाकी आणि वाहने जाळली, शिवाय जमावाने एक बसही पेटवून दिली. Violence in Nalanda after Sasaram in Ram Navami procession Three people were injured in the firing

हिंसाचाराच्या वेळी गोळीबारही झाला ज्यामध्ये तीन जणांना गोळ्या लागल्या. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. परिस्थितीचे गांभीर्य पाहता नालंदामध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. बिहार शरीफच्या रुग्णालयातील डॉक्टर चित्रांश यांनी सांगितले की, तीन जणांना गोळ्या लागल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

लहेरी पोलीस स्टेशन परिसरात रामनवमीच्या मिरवणुकीत दोन गट समोरासमोर आल्याने हिंसाचार झाला. जमावाने दगडफेक आणि जाळपोळ सुरू केली. रिपोर्टनुसार, अनेक दुकानांनाही आग लावण्यात आली. हिंसाचाराच्या घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. सासाराममध्येही गदारोळ झाला होता.

Violence in Nalanda after Sasaram in Ram Navami procession Three people were injured in the firing

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub