वृत्तसंस्था
इंफाळ : मणिपूरच्या तेंगनॉपाल जिल्ह्यातील मोरेहमध्ये बुधवारी नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला. या हल्ल्यात राज्य पोलिसांच्या इंडियन रिझर्व्ह बटालियनच्या कमांडोसह दोन जवान शहीद झाले. हल्लेखोर कुकी समुदायातील असल्याचे सांगण्यात आले.Violence in Manipur, mob rages against arrest of accused in SDPO murder, attacks at 3 places, 2 jawans martyred
बुधवारी सकाळी नक्षलींनी वेगवेगळ्या तीन ठिकाणी जवानांना लक्ष्य केले. हल्लेखोर बुलेटप्रूफ वाहनाने आले. त्यांनी एक चौकी व एका छावणीवर बाॅम्बवर्षाव केला. गोळीबारही केला. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास चिकिम गावातील डोंगरा शिखरावरून नक्षलवाद्यांनी पहिला हल्ला केला. त्यात छावणीवर रॉकेट व ग्रेनेड डागण्यात आले. जवान झोपेत असताना हा हल्ला झाला. ऑक्टोबरमध्ये मोरेहचे एसडीपीओ आनंदसिंह चौधरी यांची हत्या झाली होती. या प्रकरणात सोमवारी दोन संशयित फिलिप खोंगसाई व हेमोखोलाल मटे यांना अटक झाली होती.त्याविरोधात स्थानिकांनी विरोध केला.
सर्वात मोठे आंदोलन करू
मैतेई संघटना केआयकेजेसीसीचे सहसंयोजक वाय इबेयिमा म्हणाले, दोघांच्या अटकेमुळे मोरेहमधील परिस्थिती सामान्य करता येऊ शकेल. कुकी महिला संशयितांच्या सुटकेच्या मागणीवरून गदारोळ करत आहेत. हे चुकीचे आहे. कुकी व त्यांच्या दबावाखाली सुटका झाल्यास आतापर्यंतचे सर्वात मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा या संघटनेने दिला.
कुकी म्हणाले- दोघांची सुटका करा
अन्यथा परिणाम वाईटकुकी एनपी टेग्नोपालने (केआयटी) हत्येप्रकरणात अटकेत फिलिप खैखोलाल खोंगसोई व हेमखोलाल मेट यांची सुटका करण्यासाठी चोवीस तासांचा अवधी दिला आहे. दोघेही केआयटीचे सदस्य असल्याचे सांगण्यात येते. दोघांवरील आरोप बिनबुडाचे आहे. कुकी-मेजोने कमांडो मागे घेण्यास सांगितले. १० आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे.
मोरेहमध्ये परिस्थिती आणखी बिघडणे शक्य
मोरेहमधील परिस्थिती काही दिवसांत आणखी बिघडू शकते. त्यामागे दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे कुकीबहुल भागातील तैनात सैनिकांना तत्काळ मागे घेण्यात यावे, अन्यथा राज्यभरात रक्तपाताचा खेळ सुरू होईल, अशी थेट धमकी कुकी संघटनेने राज्य सरकारला दिली आहे. दुसरे कारण म्हणजे संशयित कुकी नक्षली म्यानमारच्या साथीने सुरक्षा दलावर हल्ले करू लागले आहेत. त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रे आहेत. त्याशिवाय छुप्या पद्धतीने युद्धाचे तंत्रही त्यांना ठाऊक आहे. त्यांची रणनीती समजत नसल्याने सुरक्षा दल बळी पडत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App