मणिपूरमध्ये पुन्हा भडकला हिंसाचार ; दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद, सहा जखमी

जिल्ह्यात बंदुक आणि स्फोटकांचा वापर करून राज्य दलांवर हिंसक हल्ला केला.


विशेष प्रतिनिधी

इंफाळ : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. मोरेह भागात मणिपूर पोलिसांचे दोन कमांडो शहीद झाले आहेत. दरम्यान, अन्य सहा जण जखमी झाले आहेत. मणिपूर पोलिसांनी ट्विटरवर पोस्ट केले की बुधवारी, दहशतवाद्यांनी राज्य पोलिस दलावर हल्ला केला, ज्यात सोमरजीत मीतेई आणि ताखेलांबम सिलेश्वर सिंह नावाचे दोन कमांडो शहीद झाले.Violence flares up again in Manipur Two jawans martyred six injured in encounter with terrorists



मणिपूर पोलिसांनी माहिती दिली की आज (17 जानेवारी, 2024) सकाळी, दहशतवाद्यांनी मोरेह, तेंगनौपल जिल्ह्यात बंदुक आणि स्फोटकांचा वापर करून राज्य दलांवर हिंसक हल्ला केला. या घटनेत 6व्या मणिपूर रायफल्सचे जवान वांगखेम सोमरजीत मेईते हे कर्तव्य बजावताना शहीद झाले. याशिवाय, मोरेह येथे सशस्त्र अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात 10 व्या IRB चे आणखी एक मणिपूर पोलिस कर्मचारी ताखेलांबम सिलेश्‍वर सिंग हे देखील शहीद झाले.

राज्य पोलिसांनी पुढे माहिती दिली की राज्याच्या सुरक्षेसह कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणार्‍या घटकांवर दले कारवाई करत आहेत. याशिवाय मोहम्मद कमल हसन, सोंगसुथुई एमोल, मोहम्मद अब्दुल हसिम, नागसेपम विम, एएसआय सिद्धार्थ थोकचोम, के प्रेमानंद जखमी झाल्याची माहिती मणिपूर पोलिसांनी दिली.

Violence flares up again in Manipur Two jawans martyred six injured in encounter with terrorists

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub