डॉक्टरांच्या पथकाककडून आवश्यक त्या सर्व चाचण्या केल्या जात आहेत.
मुंबई : Vinod Kamblis भारतीय संघाचा क्रिकेटर विनोद कांबळीची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यावा ठाण्यातील प्रगती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांचे पथक त्याच्यावर उपचार करत असून आवश्यक सर्व चाचण्या केल्या जात आहेत.Vinod Kamblis
विनोद कांबळीने 1991 साली भारतीय संघाकडून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने 1993 मध्ये टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण केले. सुरुवातीला त्याने टीम इंडियासाठी दमदार कामगिरी केली होती. तो भारतासाठी सर्वात जलद 1000 कसोटी धावा करणारा फलंदाज होता. त्याने 14 डावात ही कामगिरी केली. पण नंतर त्याने दमदार कामगिरी सोडली अन् वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे तो चर्चेत आला.
विनोद कांबळीने भारतीय संघासाठी 17 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 1084 धावा केल्या आहेत, ज्यात 4 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय, त्याने टीम इंडियासाठी 104 एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 2477 धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतके आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. 2000 च्या दशकात त्याची कामगिरी खूपच खराब होती आणि त्यामुळे त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले होते. त्याने टीम इंडियासाठी शेवटचा वनडे सामना 2000 साली श्रीलंकेविरुद्ध खेळला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App