सावरकरांचा अपमान; ठाकरेंचे मालेगावात भाषण, सामनात अग्रलेख, आता राऊत दिल्लीत राहुलजींशी करणार चर्चा; हा इशारा की मनधरणी??

प्रतिनिधी

मुंबई : राहुल गांधींनी दिल्लीच्या पत्रकार परिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या माफीनाम्याचा अस्थानी उल्लेख करून त्यांचा अपमान केला. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर विधानसभेत शिवसेनेच्या ठाकरे गटाची काढली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना कालचा मालेगावच्या सभेत राहुल गांधींना इशारा द्यावा लागला. त्यावर आज सामनाच्या अग्रलेखात पुन्हा त्यावर शिक्कामोर्तबही करावे लागले. Veer savarkar insult issue : is Uddhav Thackeray warning rahul Gandhi or appeasing him??

आता त्यापुढे जाऊन संजय राऊत हे दिल्लीत राहुल गांधींशी या विषयावर चर्चा करणार आहे पण या सर्व घडामोडींमुळे एक प्रश्न मात्र निर्माण झाला आहे, तो म्हणजे सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना इशारा दिला आहे की त्यांची मनधरणी चालू केली आहे??

उद्धव ठाकरेंनी रविवारी मालेगावमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन सभा घेतली. ठाकरेंच्या सभेदरम्यान दुसरीकडे मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांनी सदिच्छा भेट घेतली. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचवेळी वीर सावरकरांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. मी राहुल गांधींशी या विषयावर चर्चा करेन, असे राऊतांनी नमूद केले.



वीर सावरकरांविषयीची भूमिका स्पष्ट

वीर सावरकरांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. मी या विषयावर दिल्लीत जाऊन राहुल गांधींशी चर्चा करणार आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंनीही मालेगावच्या सभेत आमची वीर सावरकरांविषयीची भूमिका स्पष्ट केली आहे असेही राऊतांनी स्पष्ट केले.

पण एवढे स्पष्टीकरण देऊनही खुद्द राहुल गांधींच्या मनात नेमके काय आहे आणि संजय राऊत राहुल गांधींना दिल्लीत कधी भेट देणार आहेत?? राऊत यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांची भूमिका बदलणार आहे का?? हे मूलभूत प्रश्न आहेत. पण हे सर्व करताना सलग दोन दिवस ठाकरे गटाने उद्धव ठाकरेंचे भाषण नंतर सामनातला अग्रलेख आणि आता प्रत्यक्ष राहुल गांधींची संजय राऊत करणार असलेली ही चर्चा यातून ठाकरे गटाने राहुल गांधींना सावरकरांचा अपमान करू नका, असा इशारा दिला आहे की त्यांची मनधरणी चालवली आहे??, हा प्रश्न निर्माण होतो आहे.

सदू आणि मधू भेटले असतील

संजय राऊत म्हणाले, सदू आणि मधू भेटले असतील, मालेगावतील उद्धव ठाकरेंची विराट सभा पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले असतील ते एकमेकांनी पुसले असतील. आम्ही त्या भेटीवर काय बोलणार? असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना भेटीवरून टोला लगावला आहे. पुढे ते म्हणाले, ते जुने मित्र असतील किंवा त्यांना नव्याने प्रेम उफाळून आले असेल आम्ही काय करणार? आम्ही आमचं काम करतोय असे राऊतांनी सांगितले.

Veer savarkar insult issue : is Uddhav Thackeray warning rahul Gandhi or appeasing him??

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात