Varun Gandhi : पीलीभीतमधील भाजप खासदार वरुण गांधी सातत्याने आपल्याच पक्षाविरोधात आवाज उठवताना दिसून आले आहेत. सोशल मीडियावर ते सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधत असतात. रविवारी त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात पुन्हा पोस्ट टाकली. त्यांनी संसदेत पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) संदर्भात खासगी सदस्य विधेयक आणण्याची घोषणा केली आहे. पोस्ट करून लोकांना त्यांचे मत त्यांनी विचारले. Varun Gandhi will bring Private Member Bill to guarantee MSP Said Now the time has come for legislation on MSP, any criticism is welcome
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पीलीभीतमधील भाजप खासदार वरुण गांधी सातत्याने आपल्याच पक्षाविरोधात आवाज उठवताना दिसून आले आहेत. सोशल मीडियावर ते सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधत असतात. रविवारी त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात पुन्हा पोस्ट टाकली. त्यांनी संसदेत पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) संदर्भात खासगी सदस्य विधेयक आणण्याची घोषणा केली आहे. पोस्ट करून लोकांना त्यांचे मत त्यांनी विचारले.
वरुण गांधी यांनी त्यांच्या प्रस्तावित खासगी सदस्याच्या मसुद्यावर लिहिले, “भारतातील शेतकरी आणि सरकारने कृषी संकटावर आयोगाच्या आत आणि बाहेर दीर्घकाळ चर्चा केली आहे. आता MSP कायद्याची वेळ आली आहे. माझ्या मते कायद्यात कोणत्या तरतुदी असाव्यात, याचा मसुदा तयार करून मी संसदेत ठेवला आहे. यावर कोणतीही टीका स्वागतार्ह आहे.
India's farmers & her governments have long debated the agricultural crisis,in & out of commissions.The time has come for an MSP law.I’ve created & submitted to parliament what I believe to be an actionable piece of legislation.I welcome any critique of it.https://t.co/oUCRSNW0Te pic.twitter.com/BiX2AGoED4 — Varun Gandhi (@varungandhi80) December 12, 2021
India's farmers & her governments have long debated the agricultural crisis,in & out of commissions.The time has come for an MSP law.I’ve created & submitted to parliament what I believe to be an actionable piece of legislation.I welcome any critique of it.https://t.co/oUCRSNW0Te pic.twitter.com/BiX2AGoED4
— Varun Gandhi (@varungandhi80) December 12, 2021
दरम्यान, यापूर्वी टीईटी प्रकरणात वरुण गांधी यांनी बड्या असामींवर कारवाई कधी होणार, असा सवाल केला होता. बहुतांश शैक्षणिक संस्था या राजकीय नेत्यांच्या मालकीच्या आहेत. कृषी कायदा आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरूनही वरुण गांधींनी सरकारविरोधात अस्वस्थता निर्माण केली आहे. आता त्यांनी यूपीटीईटी परीक्षा रद्द करण्याच्या मुद्द्यावरून यूपी सरकारवर निशाणा साधला. याआधीही वरुण गांधी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजपला अनेक पत्रे लिहिली आहेत.
Varun Gandhi will bring Private Member Bill to guarantee MSP Said Now the time has come for legislation on MSP, any criticism is welcome
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App