विशेष प्रतिनिधी
मुंबई : 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पार केल्याबद्दल भारतामध्ये उत्सव साजरा केला जातोय. यावर कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सडकून टीका केली आहे. ‘लसीकरण ही जबाबदारी आहे. इव्हेंट नाही. तिसरा डोस कधी देणार? लहान मुलांना डोस देणार का? बाहेरील देशातून लस घेतली जाणार का? या सगळ्याबाबत मोदींनी आपली भूमिका स्पष्ट करावी. अशी त्यांनी मागणी देखील केली आहे.
‘Vaccination is a responsibility. No event. Why is Modi’s photo on the vaccination certificate? ‘ : Former Chief Minister Prithviraj Chavan
फक्त 21 टक्के नागरिकांचं पूर्ण लसीकरण :
278 दिवसात फक्त 100 कोटी लसीकरणाचा टप्पा भारताने पार केला आहे. आतापर्यंत केवळ 21 टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी दिली आहे. त्याचप्रमाणे ते म्हणाले, भारताचा लसीकरण झालेल्या देशांच्या यादीत 144 वा नंबर लागतो. चीनने यापूर्वीच 110 कोटी लोकांना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत. अमेरिका, इंग्लंड, रशिया या देशांमध्ये आता बुस्टर डोस द्यायची सुरूवात झाली आहे आणि भारतातील जनतेला अजूनही लसीचे दोन्ही डोस मिळाले नाहीयेत. अजूनही जनता पूर्णपणे सुरक्षित झालेली नाहीये. तर तुम्ही इव्हेंट कोणत्या गोष्टींचा साजरा करताय? असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला आहे.
भाजपची दिशा बूथ विजयाकडे; काँग्रेसची दिशा संघ कार्यपद्धती कडे…!!
पुढे ते म्हणाले, लसीकरणाचा हा कार्यक्रम आता पूर्ण वर्षभर सुरू राहील असे वाटते आहे. पहिल्या दिवसापासून केंद्राने लस घ्या विकत घ्यायला हवी होती. मात्र तसे न करता मोदींनी खासगी कंपन्यांना लस विकत घ्यायची परवानगी दिली. त्यामुळे लसीचे दर वाढले. या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. याची मागणी त्यांनी केली.
मोदींनी कोरोनाला किरकोळ म्हणून कन्सिडर केले. त्यामुळे लस खरेदी करण्याबाबत त्यांनी उशीर केला. 21 दिवसांत कोरोनाला घालवू असं म्हणत होते मोदीजी. त्याचे काय झाले? असा सवालदेखील त्यांनी यावेळी मोदींना केलाय.
पुढे ते म्हणतात, मोदींना आपला फोटो दरवेळी कशासाठी हवा असतो? कशासाठी जाहिरात करावी लागते? जर तुम्ही इतके लोकप्रिय आहात तर जाहिरातबाजी कशासाठी केली जाते? लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर त्यांचा फोटो का लावला जातो? असे प्रश्न त्यांनी या वेळी उभे केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App