उत्तराखंड : मोदींनी अल्मोडातील सहा हजारांपेक्षाही अधिक फूट उंचीवरील जागेश्वर धाम येथे केली पूजा

व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून सीमेवर तैनात असलेल्या इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP) जवानांचीही भेट घेतली.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (गुरुवार) उत्तराखंडच्या दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांनी अल्मोडा येथील जागेश्वर धाम तीर्थक्षेत्रात प्रार्थना केली. सुमारे 6200 फूट उंचीवर असलेल्या जागेश्वर धाममध्ये 224 दगडी मंदिरे आहेत.  याप्रसंगी पंतप्रधान मोदींसोबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे देखील उपस्थित होते. Uttarakhand Modi worshiped at Jageshwar Dham at a height of more than 6000 feet in Almoda

तत्पूर्वी, उत्तराखंडच्या त्यांच्या एक दिवसीय दौऱ्याची सुरुवात करताना, पंतप्रधान मोदींनी पवित्र निवासस्थान पार्वतीकुंड येथे आदि कैलासची पूजा देखील केली. पार्वती कुंडला भेट दिल्यानंतर मोदींनी उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यातील गुंजी गावात स्थानिक लोकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले.

देवभूमीच्या त्यांच्या एक दिवसीय दौऱ्यावर, मोदींनी व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून सीमेवर तैनात असलेल्या इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP) जवानांचीही भेट घेतली. तसेच  गुंजी गावातील स्थानिक कला आणि कलाकृतींवर आधारित प्रदर्शनालाही त्यांनी भेट दिली. डोंगराळ राज्यातील गुंजी हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे, याला शिवस्थळ म्हणूनही ओळखले जाते.  2021 मध्ये येथे मोठ्या प्रमाणावर शिवमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात देश-विदेशातील लोक सहभागी झाले होते.

संयुक्त राष्ट्र संघाचे अध्यक्ष म्हणून पत्र लिहिले, तरी मुख्यमंत्री पदाचे स्वप्न अपूर्णच; काकांचा पुतण्याला टोला

रस्ते, वीज, ग्रामीण विकास, सिंचन, आरोग्य, पिण्याचे पाणी, फलोत्पादन, आपत्ती व्यवस्थापन आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रातील सुमारे 4200 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान मोदींनी आपल्या उत्तराखंड दौऱ्यात केली आहे.

Uttarakhand Modi worshiped at Jageshwar Dham at a height of more than 6000 feet in Almoda

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात