वृत्तसंस्था
टिहरी : Uttarakhand उत्तराखंडमधील टिहरी येथे भाविकांनी भरलेली बस 70 मीटर खोल दरीत कोसळली, ज्यात 5 लोकांचा मृत्यू झाला आहे. टिहरीचे एसपी आयुष अग्रवाल यांनी याची पुष्टी केली. दुपारी सुमारे साडेबारा वाजता झालेल्या या अपघातात गुजरात, हरियाणा, बिहार, उत्तरप्रदेश, पंजाब, महाराष्ट्र आणि दिल्लीचे 13 लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे.Uttarakhand
बस ऋषिकेशमधील दयानंद आश्रमातून 29 लोकांना कुंजापुरी मंदिरात घेऊन गेली होती, येथून परत येत असताना कुंजापुरी–हिंडोलाखालजवळ अचानक बसचे ब्रेक फेल झाले आणि चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले.Uttarakhand
नरेंद्रनगर पोलिस ठाण्याचे दरोगा संजय यांनी माहिती देताना सांगितले की, अपघातानंतर बस (UK14PA1769) मधून मृतदेह बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या 6 लोकांना ऋषिकेश येथील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे, तर 7 लोकांना नरेंद्रनगर येथील श्री देव सुमन रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. 5 मृतांमध्ये 4 महिला आणि 1 तरुणाचा समावेश आहे.Uttarakhand
मृतांमध्ये दिल्ली, गुजरात आणि उत्तरप्रदेशातील लोकांचा समावेश
या अपघातात पाच लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये दिल्लीच्या अनिता चौहान, गुजरातचे पार्थसाथी मधुसूदन जोशी, महाराष्ट्राच्या नमिता प्रबोध, बंगळूरुचे अनुज व्यंकटरमन आणि सहारणपूर, उत्तर प्रदेशचे आशु त्यागी यांचा समावेश आहे. सर्व प्रवाशांचा मृत्यू घटनास्थळीच झाला होता.
जखमींमध्ये सर्वाधिक गुजरातचे लोक
जखमींमध्ये दिल्लीचे 69 वर्षीय नरेश चौहान यांचा समावेश आहे, तर हरियाणा अंबाला येथून 50 वर्षीय दीक्षा जखमी झाल्या आहेत. गुजरात येथून सर्वाधिक लोक जखमी झाले आहेत, ज्यात 63 वर्षीय बालकृष्ण, 60 वर्षीय चैतन्य जोशी, 71 वर्षीय प्रशांत ध्रुव, 70 वर्षीय प्रतिभा ध्रुव यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, मुंबई येथून 52 वर्षीय अर्चिता गोयल, शिवकुमार शाह आणि 55 वर्षीय माधुरी जखमी झाले. उत्तराखंड येथून 60 वर्षीय शंभू सिंह, उत्तर प्रदेश वाराणसी येथून 50 वर्षीय राकेश आणि पंजाब येथून 49 वर्षीय दीपशिखा हे देखील या दुर्घटनेत जखमी आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App