उत्तर प्रदेश डिजीटल क्रांतीच्या दिशेने, सॉफ्टवेअर पार्कचे निर्यातीत २२ हजार कोटींहून अधिक रुपयांचे योगदान

विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेश डिजीटल क्रांतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. केंद्र सरकारकडून उत्तर प्रदेशात इंटरनेट एक्सचेंज, तंत्रज्ञान पार्क आणि उद्योजकता केंद्रे उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येथील सॉफ्टवेअर पार्क आॅफ इंडियाने २२,६७१ रुपयांची निर्यात केली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहेत.Uttar Pradesh towards Digital Revolution, Software Park contributes over Rs 22,000 crore in exports

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये सात इंटरनेट एक्स्चेंज सुरू केले आहेत. लखनऊमध्ये उद्योजकता केंद्र आणि मीरतमध्ये सेंटर फॉर एक्सेलन्स सुरू होत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तरुणांना सरकारच्या प्रमुख डिजिटल इंडिया मोहिमेशी जोडण्यासाठी एक कोटी पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मोफत टॅब्लेट आणि स्मार्ट फोन वितरित करण्याची मोहीम सुरू केली.



केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी प्रयागराज, गोरखपूर, लखनौ, वाराणसी, मेरठ, कानपूर आणि आग्रा येथे इंटरनेट एक्सचेंजेस तसेच गोंडा, वाराणसी, मुरादाबाद आणि सहारनपूर येथे आधार सेवा केंद्रांचे उद्घाटन केले.

लखनऊ येथील उद्योजकता केंद्र वैद्यकीय आणि आरोग्य तंत्रज्ञानातील नवकल्पना, उद्योजकता आणि स्टार्ट-अपसाठी काम करणार आहे. उत्तर प्रदेशला वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांचे उत्पादन केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मेडटेक स्टार्ट-अप सुरू होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या भारतनेट प्रकल्पाचा मोठा फायदा उत्तर प्रदेशला होणार आहे. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले बोर्ड्सच्या उत्पादनासाठी नुकत्याच जाहीर केलेल्या 76,000 कोटी रुपयांच्या योजनेचाही उत्तर प्रदेशला होणार आहे. सिलिकॉन सेमीकंडक्टर, डिस्प्ले, कंपाऊंड सेमीकंडक्टर आणि इतर संबंधित उत्पादनांच्या निर्मितीमधील कंपन्यांना यामुळे मदत मिळणार आहे.

Uttar Pradesh towards Digital Revolution, Software Park contributes over Rs 22,000 crore in exports

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात