भारतात वेगाने होत असलेल्या शहरीकरणाचे नियोजन ३० वर्षांपूर्वी व्हायला हवे होते, असंही म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उत्तर प्रदेश दौऱ्यात आझमगडमध्ये एकाच वेळी अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. पंतप्रधान मोदींनी एकूण 34 हजार 700 कोटी रुपयांच्या 782 विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.Uttar Pradesh not only determines the politics of the country but also determines the direction of development Modis statement in Azamgarh
या प्रकल्पांमध्ये आझमगडसह राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये बांधण्यात आलेल्या विमानतळांचाही समावेश आहे. यामध्ये मुरादाबाद, अलिगढ, श्रावस्ती आणि चित्रकूटच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय ग्वाल्हेर, कोल्हापूर, पुणे आणि जबलपूर टर्मिनलच्या विस्तारीकरणाची पायाभरणीही पंतप्रधान मोदींनी केली. उद्घाटन आणि पायाभरणी कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदींनी येथे एका मोठ्या जाहीर सभेलाही संबोधित केले.
आझमगडमध्ये काय म्हणाले मोदी?
मोदी म्हणाले की, ज्याप्रमाणे आमच्या सरकारने लोककल्याणाच्या योजना मेट्रो शहरांपलीकडे लहान शहरे आणि खेड्यांपर्यंत नेल्या, त्याचप्रमाणे आम्ही आधुनिक पायाभूत सुविधांचे काम छोट्या शहरांमध्येही नेत आहोत. मोठ्या शहरांइतकीच लहान शहरेही चांगली विमानतळे आणि चांगले महामार्ग मिळण्यास पात्र आहेत.
तसेच मोदी म्हणाले की, भारतात वेगाने होत असलेल्या शहरीकरणाचे नियोजन ३० वर्षांपूर्वी व्हायला हवे होते आणि ते झाले नाही. हे लक्षात घेऊन आज आम्ही टियर 2, टियर 3 शहरांची ताकद वाढवत आहोत जेणेकरून शहरीकरण थांबू नये. आमच्या सरकारच्या काळात तरुणांसाठी महाराजा सुहेल देव महाविद्यालयाची पायाभरणी झाली आणि त्याचे उद्घाटनही झाले. उत्तर प्रदेश देशाचे राजकारण ठरवतो आणि उत्तर प्रदेश विकासाची दिशा ठरवत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. उत्तर प्रदेशमध्ये डबल इंजिनचे सरकार आल्यापासून उत्तर प्रदेशचे चित्र आणि नशीब दोन्ही बदलले आहे. असंही मोदींनी यावेळी बोलून दाखवलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App