उत्तरप्रदेश भाजप नेते जितेंद्र सिंह बबलू यांना पक्षातून डच्चू; रिटा बहुगुणा यांच्या तक्रारीवरून कारवाई

वृत्तसंस्था

लखनौ : उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे नेते जितेंद्र सिंह बबलू यांना पक्षातून डच्चू देण्यात आला आहे. ज्येष्ठ नेत्या रिटा बहुगुणा-जोशी यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. Uttar Pradesh BJP leader Jitendra Singh Bablu expelled from the party; Action on Rita Bahuguna’s complaint

बहुजन समाज पार्टीतून बबलू यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याला बहुगुणा यांनी आक्षेप घेतला होता. एक डझनपेक्षा अधिक गुन्हे बबलू यांच्यावर असून रिटा बहुगुणा यांचे घरही जाळल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

अयोध्येपासून लाखनौपर्यंत त्यांचा दबदबा आहे. मायावती यांचे निकटवर्तीय म्हणून त्याचा नावलौकिक होता. एकदा तर मयावती यांनी त्यांना विधानपरिषदेचे आमदार बनविल्याने ते माध्यमात झळकले होते. याच दरम्यान, तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रिटा बहुगुणा यांचे घर जाळण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात बबलू आणि साथीदारांना अटक आणि नंतर कारावास झाला होता.

बहुगुणा यांनी नंतर भाजपात प्रवेश केला. प्रयागराजच्या खासदार असून योगी यांच्या मंत्रिमंडळात त्या होत्या. ४ ऑगस्टला झालेल्या कार्यक्रमात बबलू यांनी बसपाच्या त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला. त्याला बहुगुणा यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. मागील वर्षी सुद्धा त्याचा पक्ष प्रवेश बहुगुणा यांच्यामुळेच टळला होता.

Uttar Pradesh BJP leader Jitendra Singh Bablu expelled from the party; Action on Rita Bahuguna’s complaint

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात