उत्तरप्रदेश ATS ने अलिगढमधून ISIS च्या दोन दहशतवाद्यांना पकडले, केमकिल हल्ला घडवण्याचा होता डाव!


अटक करण्यात आलेले दोघेही अलीगढ मुस्लीम विद्यापीठ संघटनेचे सदस्य आहेत.


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तरप्रदेश एटीएसने अलिगढमधून ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची टीमही या दोघांची चौकशी करणार आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही दहशतवादी अलीगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी संघटनेचे विद्यार्थी आहेत.Uttar Pradesh ATS nabs two ISIS terrorists from Aligarh

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने नुकतेच जामिया मिलिया इस्लामियाचा पीएचडी विद्यार्थी अर्शद वारसी आणि पुणे इसिस प्रकरणातील राष्ट्रीय तपास संस्थेचा (एनआयए) वाँटेड दहशतवादी शाहनवाज यांना दिल्लीतून अटक केली होती.



एनआयए आणि दिल्ली स्पेशल सेलने अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांकडून अलीगढचे रहिवासी अब्दुल्ला अर्सलान आणि माझ बिन तारिक यांची माहिती मिळाली होती. त्यानंतर यूपी एटीएसने अलीगडमध्ये छापा टाकून दोघांनाही अटक केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ISIS चे संपूर्ण भारतातील मॉड्यूल आहे ज्यामध्ये उत्तर प्रदेश, झारखंड, पुणे येथील शिक्षित विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

ATS ने ISIS या खतरनाक दहशतवादी संघटनेशी संबंधित अब्दुल्ला अर्सलान आणि माझ बिन तारिक या दोन दहशतवाद्यांना अलीगढ येथून अटक केली आहे. ते यूपीमध्ये मोठी दहशतवादी घटना घडवण्याची योजना आखत असल्याची माहिती आहे. दोघेही इसिसच्या पुणे मॉड्यूलशी संबंधित होते.

Uttar Pradesh ATS nabs two ISIS terrorists from Aligarh

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात