आसाम मध्ये भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधींकडून बॉडी डबलचा वापर??

विशेष प्रतिनिधी

गुवाहाटी : आसाम मध्ये भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधींनी त्यांचा बॉडी डबल वापरल्याचे धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंडिया टुडेने दिलेल्या बातमीत या संदर्भात दावा करण्यात आला आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी त्या बातमीच्या सहवाल्याने हा मुद्दा उचलून धरला. Use of body double by Rahul Gandhi in Bharat Jodo Nyaya Yatra in Assam

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा असा मधून आधीच पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली आहे, पण आसाम मधल्या यात्रेच्या दरम्यान त्यांनी आपल्या डुप्लिकेटचा वापर त्या यात्रेत केला होता, असे इंडिया टुडेच्या बातमीत नमूद करण्यात आले आहे. या बातमीचाच हवाला देत मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी राहुल गांधींच्या न्यायात्रेवरच प्रश्न ठळक प्रश्नचिन्ह लावले.

राहुल गांधी ज्या बसमधून सफर करतात, त्या बस मध्ये आठ जणांना बसण्याची आरामदायी सोय करण्यात आली आहे. न्याय यात्रेत राहुल गांधी त्या बसमध्ये बसून राहिले आणि खिडकीत येऊन त्यांच्या बॉडी डबलने म्हणजेच डुप्लिकेटने हात हलवत लोकांना अभिवादन केले असा फोटो प्रसिद्ध झाला आहे. तो बॉडी डबल लांबून राहुल गांधीच दिसतो पण प्रत्यक्षात जवळ जाऊन पाहिल्यावर तेव्हा तो बॉडी डबल असल्याचे स्पष्ट होते आणि त्याचवेळी राहुल गांधी मात्र आरामात बसमध्ये बसून राहिले होते, असे हेमंत विश्वशर्मा यांनी इंडिया टुडेच्या बातमीच्या हवाल्याने म्हटले आहे.

राहुल गांधींचे भारत जोडो न्याय यात्रा आसाम मध्ये बरीच वादग्रस्त ठरली. आसामचे मुख्यमंत्री सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत, असा आरोप राहुल गांधींनी वेगवेगळ्या भाषणांमधून केला, तर राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेमार्फत आसाम मध्ये जातीय विष पेरत आहेत, असा प्रत्यारोप मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी केला. राहुल गांधींना अटक करण्याची भाषा देखील त्यांनी केली. पण लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांना अटक करून त्यांना सहानुभूती मिळू देणार नाही, तर त्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही विश्वशर्मा यांनी स्पष्ट केले. त्या पाठोपाठ राहुल गांधींच्या बॉडी डबलचा मुद्दा समोर आला आहे.

Use of body double by Rahul Gandhi in Bharat Jodo Nyaya Yatra in Assam

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात