विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : इस्राईलने आज सलग १२ व्या दिवशी गाझा पट्टीत हवाई हल्ले केले. याममध्ये किमान एका पॅलेस्टीनी नागरिकाचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यावर संघर्ष थांबविण्यासाठी मोठा राजकीय दबाव येत असला तरी हमासचे जास्तीत जास्त नुकसान करण्याबरोबरच आपले राजकीय अस्तित्व कायम राखण्याकडे नेतान्याहू यांचा भर आहे. USA against ceasefire in Gaza
दरम्यान इस्राईल आणि गाझा पट्टीतून हल्ले करणाऱ्या हमास या दहशतवादी संघटनेमध्ये शस्त्रसंधी घडवून आणण्याच्या प्रस्तावाला अमेरिकेने आज विरोध केला. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये याबाबत चर्चा सुरु असताना अमेरिकेने विरोध करताना, या प्रस्तावामुळे वाद मिटविण्यासाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण होईल, असा दावा केला.
फ्रान्सने हा प्रस्ताव सुरक्षा समितीमध्ये मांडला होता. हिंसाचार थांबविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे संयुक्त निवेदन जारी करण्याच्या प्रयत्नांना अमेरिकेने आतापर्यंत चार वेळा विरोध केल्यानंतर हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. समितीमधील सर्व सदस्यांनी प्रस्तावाला मान्यता दिली असली तरी इस्राईलच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या असलेल्या अमेरिकेने मात्र विरोध केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App