US tax : अमेरिकी करात 145% पर्यंत वाढ; चीनचा लढण्याचा निर्धार, फेंटेनाइल तस्करीमुळे 20% जास्तीची करवाढ

US tax

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : US tax  अमेरिकेने चीनवरील व्यापार कर (टेरिफ) १२५% वरून १४५% पर्यंत वाढवला आहे. फेंटनाइलच्या तस्करीत चीनचा हात असल्याने २०% अतिरिक्त कर लावण्यात येईल. एक दिवस आधीच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर १२५% कराची घोषणा केली होती. दरम्यान, अमेरिका-चीनमधील व्यापार युद्धाच्या तिढ्यावर तोडगा निघण्याचीही शक्यता आहे. तथापि, टेरिफ दादागिरीसमोर झुकणार नाही, असे संकेत देऊन या मुद्द्यावर अमेरिकेला आधी पाऊल उचलावे लागेल, असे चीनने म्हटले आहे.US tax

चिनी वाणिज्य मंत्रालयाच्या प्रवक्त्या योंगकियान म्हणाल्या, अमेरिकेला आधी एक पाऊल पुढे टाकावे लागेल. परंतु तोडगा न निघाल्यास शेवटपर्यंत लढण्याचा आमचा निर्धार आहे. इकडे, ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे एक समजूदार व्यक्ती आहेत, अशी भलामण करून तोडगा काढण्याचे संकेत दिले. तर तोडगा कधी निघेल सांगता येत नाही, असे व्हाइट हाऊसचे आर्थिक सल्लागार केव्हिन हॅसेट म्हणाले. दरम्यान, भारतावरील २६% टेरिफ ९० दिवसांसाठी (९ जुलैपर्यंत) स्थगित केल्याची अधिसूचना गुरुवारी रात्री जारी करण्यात आली आहे.



व्यापार युद्ध सुरू झाल्यास चीन डंपिंगचे प्रयत्न करेल, आयात स्वस्त झाल्याने महागाई घटेल

भारतावर १०%, चीनवर १४५% आयात कर आहे. या फरकामुळे भारताला लाभ होऊ शकतो.

अमेरिकेने व्हिएतनाम, इंडोनेशिया, बांगलादेशवर अधिक कर लादला. टेरिफचा हा संघर्ष जोपर्यंत असेल तोपर्यंत चीनमध्ये गंुतवणूक करणाऱ्या कंपन्यांना भारताचे आकर्षण निर्माण होईल. भारताला परदेशी गुंतवणूक, तंत्रज्ञान आदानप्रदानाचा फायदा होऊ शकतो. चीनवर आयात कर राहील तोपर्यंत इतर देशांत निर्यात वाढवण्याचा प्रयत्न करेल. तो किमती घटवून डंपिंगचा प्रयत्न करेल. आयात स्वस्त झाल्याने वस्तूही स्वस्त होतील. आपल्यावर महागाईचा परिणामही कमी होईल. रिझर्व्ह बँकेला व्याज दर कपात करण्याची संधी असेल.

भारताला वस्रोद्योग क्षेत्रात संधी वाढतील. चीन-बांगलादेश हे आपले प्रतिस्पर्धी आहेत. त्यांच्या निर्यातीवरील वाढत्या शुल्कामुळे भारतासाठी संधी वाढतात. भारत उत्पादन क्षेत्रात चिनी सुट्याभागांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. उदा. इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी, सेमीकंडक्टर, डिस्प्ले पॅनेल इत्यादी. त्यांच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो. औषध क्षेत्र देखील ७०% पर्यंत एपीआयसाठी चीनवर अवलंबून आहे. जर यामध्ये अडथळा आला तर खर्च वाढू शकतो. जागतिक जेनेरिक औषध बाजारपेठेवर परिणाम होऊ शकतो. चीनमधील वाढत्या खर्चामुळे आणि अस्थिरतेमुळे चिंतित असलेल्या अमेरिकन कंपन्या बॅकएंड ऑपरेशन्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि एआय सपोर्टमध्ये भारतात आउटसोर्सिंग वाढवू शकतात.

टेरिफ इफेक्ट: चीनमधील आयफोन २००० डॉलर, भारतातील १२५०

ॲपल कंपनी भारतातून आयफोनची आयात वाढवत आहे. कंपनीने १५ लाख फोन सहा कार्गो विमानांनी भारतातून अमेरिकेत नेले. त्यातील एक विमान गेल्या आठवड्यात गेले. भारत आता ॲपलचे १४% आयफोन बनवतो. चीनवर १०४% टेरिफनंतर १००० डॉलरच्या आयफोनची किंमत अमेरिकेत २००० डॉलरहून जास्त होईल. तर, २६% टेरिफसह भारतात बनलेला आयफोन १२५० डॉलरला मिळेल. २०२४-२५ आर्थिक वर्षात एप्रिल ते जानेवारीपर्यंत ८ महिन्यांत भारतातून १ लाख कोटी रुपयांच्या आयफोनची निर्यात झाली. जी गतवर्षी याच कालावधीत ६० हजार कोटी रुपये इतकी होती.

US tax hike up to 145%; China determined to fight, 20% more tax hike due to fentanyl smuggling

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात