जाणून घ्या, अमेरिकेकडून काय म्हटले गेले आहे?
विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : Bangladesh शेख हसीना यांचे सरकार उलथून टाकल्यानंतर बांगलादेशात काय चालले आहे याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. बांगलादेशचे भारतासोबतचे संबंध आता सामान्य राहिलेले नाहीत. यावर अमेरिकेने भारत आणि बांगलादेशने आपले मतभेद शांततेने सोडवण्याची विनंती केली आहे.Bangladesh
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी आपल्या दैनंदिन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भारताच्या परराष्ट्र सचिवांच्या नुकत्याच झालेल्या बांगलादेश दौऱ्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मिलर म्हणाले, “सर्व पक्षांनी त्यांचे मतभेद शांततेने सोडवावेत अशी आमची इच्छा आहे.”
याआधी परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सोमवारी बांगलादेशला भेट दिली होती आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत भारताच्या चिंतेबद्दल त्यांना माहिती दिली होती. “मी बांगलादेशच्या अंतरिम सरकारसोबत जवळून काम करण्याची भारताची इच्छा व्यक्त केली,”
मिसरी यांनी त्यांच्या भेटीच्या शेवटी ढाका येथे पत्रकारांना सांगितले होते. आम्हाला काही अलीकडच्या घडामोडी आणि मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळाली आणि मी त्यांना अल्पसंख्याकांच्या सुरक्षा आणि कल्याणाशी संबंधित चिंतांची माहिती दिली.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनीही देशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अलीकडेच, त्यांच्या पक्ष अवामी लीगच्या एका कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी होताना हसिना म्हणाल्या होत्या की, मोहम्मद युनूसने बांगलादेशला अराजकतेत ढकलले आहे. युनूसमुळेच बांगलादेशात सामूहिक हत्या होत आहेत आणि हिंदूंना टार्गेट केले जात आहे, तो या सगळ्याचा मास्टरमाईंड असल्याचे ते म्हणाले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App