हजारो अमेरिकन भारतीयांच्या जल्लोषात पंतप्रधान मोदींचे व्हाईट हाऊस मध्ये स्वागत; भारतात लोकशाही, धार्मिक स्वातंत्र्य अबाधित, बायडेन यांचा निर्वाळा!!

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हजारो भारतीय अमेरिकन यांच्या उपस्थितीत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्हाईट हाऊस मध्ये जोरदार स्वागत केले. भारतात लोकशाही, धार्मिक स्वातंत्र्य अबाधित असल्याचा निर्वाळा यावेळी बायडेन यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी व्हाईट हाऊसच्या लॉन वर हजारो भारतीय अमेरिकन नागरिक, अमेरिकन प्रशासनाचे ज्येष्ठ मंत्री उपस्थित होते. त्यांच्या “मोदी मोदी”च्या जयघोषात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी मोदींचे स्वागत केले. या स्वागत समारंभात बायडेन आणि मोदी या दोघांनीही मनोगते व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींचे स्वागत करताना राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी भारतात लोकशाही स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, धार्मिक बहुलता अबाधित असल्याचा निर्वाळा दिला, तर पंतप्रधान मोदींनी आपण पंतप्रधान बनल्यावर व्हाईट हाऊस मध्ये अनेकदा आलो. पण आज पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय – अमेरिकी समुदायासाठी व्हाईट हाऊसचे दरवाजे उघडल्याचे पाहून अत्यंत आनंद झाला, अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली.

भारताच्या पंतप्रधानांचे व्हाईट हाऊस मध्ये जोरदार स्वागत हा 140 कोटी यांचा सन्मान आणि गौरव तर आहेच, पण त्याचबरोबर अमेरिकेत राहत असलेल्या चार मिलियन भारतीय लोकांचाही सन्मान आहे, असे उद्गार पंतप्रधान मोदींनी काढले.

कायद्यापुढे सर्व समान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक बहुलता हा भारत आणि अमेरिकन जनतेचा मूळ सिद्धांत दृढ आहे आणि तो अधिक विकसित झाला आहे, अशा शब्दांत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी भारताचे कौतुक केले.

त्याच वेळी बायडेन यांनी “क्वाड”चा उल्लेख केला. पंतप्रधान मोदींच्या सहयोगाने भारत – अमेरिका – जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांनी हिंद पॅसिफिक महासागर क्षेत्राच्या समृद्धीसाठी “क्वाड”ला मजबूत केले आहे. येत्या काही दशकांनंतर लोक जेव्हा मागे वळून बघतील तेव्हा त्यांच्याही निश्चित लक्षात येईल की जगाच्या भल्यासाठी “क्वाड”ने इतिहासाला एक नवी दिशा दिली, असे गौरव उद्गार बायडिंग यांनी काढले.

US President Joe Biden & PM Narendra Modi share a warm embrace as PM Modi is welcomed at the White House

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात