प्रजासत्ताकदिनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन भारतात येणार नाहीत; व्यग्र असल्याचे कारण, जानेवारीत होणारी क्वाड बैठकही पुढे ढकलली

US President Biden

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन प्रजासत्ताक दिन 2024 साठी भारतात येणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी ही माहिती दिली. याशिवाय जानेवारीमध्ये भारतात होणारी क्वाड समिटही पुढे ढकलण्यात आली आहे. 26 जानेवारीच्या सुमारास ही बैठक होणार होती.US President Biden will not come to India on Republic Day; Quad meeting in January was also postponed

न्यूज एजन्सी एएनआयनुसार, भारताने क्वाड बैठकीसाठी तयार केलेल्या वेळापत्रकावर इतर देश सहमत झाले नाहीत. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शेवटच्या वेळी 2015 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला हजेरी लावली होती. आपल्या 3 दिवसांच्या दौऱ्यात ओबामा यांनी पीएम मोदींसोबत मन की बात कार्यक्रमातही भाग घेतला.



यावेळी भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमंत्रणावर अमेरिकेने अद्याप काहीही सांगितले नव्हते. त्याच वेळी क्वाड सदस्य देश ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय दिवसदेखील 26 जानेवारी रोजी आहे. यामुळे अँथनी अल्बानीज त्यावेळी क्वाड सभेला उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे आता जपानचे पंतप्रधान फुमिया किशिदा भारतात येण्याची फारशी आशा नाही.

2023 मध्येही पुढे ढकलली होती क्वाड बैठक

2023ची क्वाड बैठक जपानच्या हिरोशिमा शहरात झाली. यापूर्वी ही बैठक ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे होणार होती. मात्र, त्यावेळी अमेरिकेतील कर्जाच्या संकटामुळे ती बायडेन यांच्या विनंतीवरून पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर जी 7 देशांच्या बैठकीचे नियोजन करण्यात आले.

हिरोशिमामध्ये पंतप्रधान मोदींनी 2024 मध्ये भारतात क्वाड बैठक होणार असल्याची घोषणा केली होती. त्यासाठी सर्व सदस्य देशांच्या प्रमुखांना भारतात यावे लागेल. क्वाडचे अध्यक्षपद दरवर्षी सर्व सदस्य देशांमध्ये फिरते. त्याचे अध्यक्षपद 2023 मध्ये जपानकडे होते.

US President Biden will not come to India on Republic Day; Quad meeting in January was also postponed

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात