UPI : 1 ऑगस्टपासून UPI व्यवहारात नवे नियम लागू होणार; बॅलन्स चेक, ऑटोपेवर मर्यादा येणार

UPI

वृत्तसंस्था

नवी दिल्ली :UPI  १ ऑगस्ट २०२५ पासून युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) व्यवहारांमध्ये काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. हे नियम देशातील सर्व UPI वापरकर्त्यांना लागू होतील, मग ते Google Pay, PhonePe, Paytm किंवा अन्य कोणतेही अ‍ॅप वापरत असोत.UPI

या नव्या नियमांनुसार, आता UPI अ‍ॅपवरून दिवसातून ५० वेळांपेक्षा जास्त बॅलन्स चेक करता येणार नाही. बऱ्याच लोकांकडून वारंवार बॅलन्स तपासला जात असल्याने UPI सिस्टीमवर जास्त भार येतो. या तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी ही मर्यादा लागू केली जात आहे. जर तुम्ही ५० वेळांपेक्षा अधिक बॅलन्स पाहिलं, तर उर्वरित दिवसभरासाठी ही सेवा थांबवली जाईल.UPI

तसेच, ऑटोपे व्यवहार जसे की नेटफ्लिक्स, EMI, मोबाईल रिचार्ज, सबस्क्रिप्शन यांसारखे पेमेंट्स आता ठराविक वेळेतच प्रक्रिया केले जातील. ही वेळ असेल – सकाळी १० वाजण्यापूर्वी, दुपारी १ ते ५ दरम्यान किंवा रात्री ९:३० नंतर. यामुळे सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळात सिस्टीमवर ताण येणार नाही.UPI



जर एखादा व्यवहार अडकला असेल, तर त्याची स्थिती फक्त तीन वेळा तपासता येईल, तेही प्रत्येक वेळेस ९० सेकंदांचे अंतर ठेवून. यामागेही उद्देश सिस्टीमवरील अनावश्यक ताण कमी करणे हाच आहे.

अलीकडे मार्च आणि एप्रिलमध्ये UPI सिस्टीममध्ये दोन वेळा अडथळे आले होते, ज्यामुळे कोट्यवधी लोकांना व्यवहार करण्यात अडचणी आल्या होत्या. हे नवे नियम त्याच पार्श्वभूमीवर लागू करण्यात येत आहेत.

तथापि, व्यवहारांच्या रकमेच्या मर्यादेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच, सामान्य व्यवहारांसाठी १ लाख रुपये आणि शिक्षण व आरोग्य संबंधित व्यवहारांसाठी ५ लाख रुपयांपर्यंतची मर्यादा तशीच राहणार आहे.

सामान्य वापरकर्त्यांना यासाठी काही विशेष करण्याची गरज नाही. हे बदल UPI अ‍ॅपमध्ये आपोआप लागू होतील. फक्त दिवसातून बॅलन्स किती वेळा तपासत आहात, यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, जेणेकरून व्यवहारात अडथळा येणार नाही. नियमित वापर करणाऱ्यांसाठी फारसा फरक जाणवणार नाही, पण वारंवार तपासणी करणाऱ्यांसाठी ही मर्यादा महत्त्वाची ठरणार आहे.

UPI Transactions New Rules August 1 Balance Check Autopay Limits

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात