UPA अध्यक्ष सोनिया “आऊट”; INDI अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे “इन”; पण INDI चे संयोजक बनायला नितीश कुमारांचा नकार!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार विरुद्ध बऱ्याच दिवसांपासून उभ्या राहत असलेल्या INDI आघाडीच्या अध्यक्षपदी अखेर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची नियुक्ती झाली. यातून INDI आघाडीच्या नेत्यांनी जुन्या UPA आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या पदावरून “हकालपट्टी” केली.UPA Chairperson Sonia “Out”; INDI President Mallikarjun Kharge “in”; But Nitish Kumar’s refusal to become the convener of INDI!!

पण मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली काम करायला नितीश कुमार यांनी नकार देत INDI आघाडीचे संयोजक पद नाकारले. वैशिष्ट्य म्हणजे ज्या ऑनलाईन बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे यांची आघाडीचे अध्यक्षपदी नियुक्ती झाली, त्या बैठकीत त्यांच्यासह फक्त दुसरे ज्येष्ठ नेते म्हणून फक्त शरद पवार हजर होते.



पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूळ काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रमुख नेते या ऑनलाइन बैठकीला हजरच नव्हते. त्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे यांची INDI आघाडीचे अध्यक्षपदी झालेली निवड मुळातच कितपत वैध ठरते याविषयी त्यांची नियुक्ती होताच शंका निर्माण झाली.

ऑनलाइन बैठकीत शरद पवार यांच्याबरोबरच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन आणि त्यांची बहीण कनिमोळी हे नेते मात्र हजर होते. या बैठकीत वेगवेगळ्या राज्यांमधल्या जागावाटपाची चर्चा झाली, अशी माहिती शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली. त्याच वेळी संयोजक पदाबाबत सर्वांनी एकमताने आपल्याला पाठिंबा दिला, तरच आपण त्या पदावर काम करू, असे नितीश कुमार यांनी सांगितल्याचा दावा शरद पवारांनी केला.

पण प्रत्यक्षात मल्लिकार्जुन खर्गे यांची INDI तिच्या अध्यक्षपदी झालेली निवड नितीश कुमार यांना एकतर्फी वाटली आणि ज्या अर्थी ते INDI आघाडीचे अध्यक्ष झालेत, त्याआधी त्यांचेच नाव भविष्यकाळात पंतप्रधान पदासाठी पुढे केले जाईल हे लक्षात आल्याने नितीश कुमार यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला नकार देऊन INDI आघाडीचे संयोजक होणे टाळल्याचे मानले जात आहे.

पण या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आधी काँग्रेस प्रणित सर्व विरोधकांनी आपले जुने युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स अर्थातUPA हे नाव आधी काढून टाकले. त्याचबरोबर त्या आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना आता नव्या INDI आघाडीच्या अध्यक्षपदी बसवणे टाळले हेच आजच्या बैठकीचे खरे फलित ठरले.

 

 सोनियांनी पुढाकार घेतला पण…

वास्तविक विरोधकांनी अनेक प्रयत्न करून देखील INDI आघाडी उभे राहात नव्हती, तेव्हा स्वतः सोनिया गांधींनी पुढाकार घेऊन बैठकीत सामील होऊन INDI आघाडी उभारण्याचे निर्णय प्रयत्न केले. ती आघाडी उभी केली. तिच्या 4 बैठका वेगवेगळ्या शहरांमधल्या 5 स्टार हॉटेलमध्ये घेतल्या. या प्रत्येक बैठकांमध्ये सोनिया गांधीच प्रमुख स्थानी होत्या. परंतु आजच्या ऑनलाईन बैठकीत INDI आघाडीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव निश्चित करून आघाडीतल्या नेत्यांनी सोनिया गांधींना अध्यक्षपदावरून दूर केल्याचेच दिसत आहे.

UPA Chairperson Sonia “Out”; INDI President Mallikarjun Kharge “in”; But Nitish Kumar’s refusal to become the convener of INDI!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात