UP Election : आम आदमी पार्टीने यूपी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 150 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. आप नेते संजय सिंह यांनी निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. UP Election First list of 150 candidates announced by AAP, 38 candidates including post graduates, doctors, engineers included
वृत्तसंस्था
लखनऊ : आम आदमी पार्टीने यूपी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 150 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. आप नेते संजय सिंह यांनी निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली.
ते म्हणाले की, पक्ष सर्व 403 जागांवर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. आप नेत्याने सांगितले की सुशिक्षित, योग्य आणि चांगले योगदान देणारे उमेदवार निवडण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. यामुळे यूपीमध्ये परिवर्तनाचे राजकारण पुढे सरकू शकते.
या यादीनुसार आपचे ३८ उमेदवार पदव्युत्तर आहेत. ‘आप’ने डॉक्टर, एमबीए, पीएचडी, आर्मी इंजिनीअर, बीएड आणि डिप्लोमाधारकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. सुशिक्षित उमेदवारांची निवड करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे आप नेते संजय सिंह यांनी स्पष्ट केले.
विधानसभा चुनाव के लिए AAP की पहली सूची… https://t.co/Vg3kjGJLQR — Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) January 16, 2022
विधानसभा चुनाव के लिए AAP की पहली सूची… https://t.co/Vg3kjGJLQR
— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) January 16, 2022
आग्रा कॅंट मतदारसंघातून प्रेमसिंग यादव, आग्रा उत्तर मतदारसंघातून कपिल वाजपेयी, आग्रा ग्रामीण मतदारसंघातून केशव कुमार निगम, आग्रा दक्षिण मतदारसंघातून रमजान अब्बास, अलिगढ शहर मतदारसंघातून मोनिका थापर, आंबेडकर नगरमधील अकबरपूरमधून मूलचंद जैस्वाल, बलियामध्ये सिकंदरपूरमधून प्रदीप कुमार यांना उमेदवार केले आहे.
अमरोहातील हसनपूरमधून अमर सिंह, बरेलीमधील नवाबगंजमधून सुनीता गंगवार, बरेली शहरातून कृष्णा भारत, बाराबंकीमधील कुर्सीमधून नीरज कुमार रावत, बस्तीमधील कप्तानगंजमधून संजय कुमार, बिजनौर शहरातून विनीत शर्मा, बदायूंच्या दातागंजमधून धीरपाल कश्यप, चंदौलीच्या दातगंज मतदारसंघातून मुगलसरायमधून साजिद अन्सारी, देवरियाच्या पाथरदेवातून जियाउल हक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
UP Election First list of 150 candidates announced by AAP, 38 candidates including post graduates, doctors, engineers included
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App