अज्ञात व्यक्तींनी पाकिस्तानात घुसून दहशतवादी म्होरक्यांना टिपून टिपून मारले, पण त्यावर पहेलगाम हल्ल्याने पाणी फेरले!!

नाशिक : पाकिस्तानात घुसून अज्ञात व्यक्तींनी दहशतवादी म्होरक्यांना टिपून टिपून मारले, पण पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये हिंदू पर्यटकांना मारून त्यावर पाणी फेरले. पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर याने हिंदू विरोधात जिहादी भाषण केले. त्यानंतर दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये हिंदू पर्यटकांवर हल्ला केला.

पण त्यापूर्वी गेल्या कित्येक महिन्यांपासून किंबहुना वर्षांपासून पाकिस्तानात घुसून अज्ञात व्यक्तींनी चुन चुन कर दहशतवादी म्होरक्यांना मारले. त्यात मुंबई हल्ल्याचे दहशतवादी होते. त्याचबरोबर अक्षरधाम मंदिरावर हल्ला करणारे दहशतवादी होते. त्यांचे म्होरके होते. अज्ञात व्यक्तींनी वेगवेगळ्या शहरांमध्ये या सगळ्यांना पॉईंट ब्लांक टिपून टिपून मारले. त्यामुळे अज्ञात व्यक्तींची दहशत पाकिस्तानातल्या दहशतवादी म्होरक्यांमध्ये पसरली होती. अज्ञात व्यक्तींना आटोक्यात आणण्याचा मार्ग त्यांना सापडत नव्हता. पाकिस्तानी राज्यकर्ते, लष्कर आणि आयएसआय यांना उघडपणे कुणाकडेही बोट दाखवता येत नव्हते.



पण ओवरसीज पाकिस्तानी कॉन्फरन्सची संधी असीम मुनीर याने साधली. त्यामध्ये हिंदू विरोधात जिहादी भाषण केले. ते पाकिस्तानी पंतप्रधान शहाबाज शरीफ याने मुकाट्याने ऐकून घेतले. असीम मुनीरच्या भाषणाला मुक संमती दिली. त्यामुळे दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये पुन्हा हिंसाचार माजवण्याची चिथावणी मिळाली. म्हणूनच दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये हिंदू पर्यटकांना टिपून टिपून मारले. त्यामुळे भारतातला संताप आता केवळ दहशतवाद्यांच्या विरोधात कुठला सर्जिकल किंवा एअर स्ट्राइक करून शमणारा नाही, तर पाकिस्तानी लष्कराच्या चिंधड्या झाल्याशिवाय आणि असीम मुनीरला उभा गाडल्याशिवाय भारतातला संताप थंडावणार नाही. थंडावता कामा नये.

पाकिस्तानी जिहादी दहशतवादाला धर्मयुद्धाने प्रत्युत्तर दिल्याशिवाय भारतीयांचा संताप आता मोदींनाही कंट्रोल करणे कठीण आहे. केवळ तत्त्वज्ञानाची भाषा झाडून किंवा डोळ्यात अंगार आणून पाकिस्तान कडे बोटे दाखवून मोदींनी भाषण केले तरी उपयोग होणार नाही. त्यापलीकडे जाऊन पाकिस्तान व्याप्त काश्मीर मध्ये हल्ला आणि प्रत्यक्ष सीमेवर पाकिस्तानी सैनिकांच्या चिंधड्या पाहिल्याशिवाय आणि असीम मुनीरला गाडल्याशिवाय जिहाद विरुद्धचे धर्मयुद्ध थांबवता कामा नये.

Unknown individuals infiltrated Pakistan and killed terrorist leaders.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात